Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मुंबईकरांचा प्रवास सुखकर केल्याबद्दल…’ नवीनच सुरु झालेल्या मेट्रोमधून प्रवास करत सुबोध भावेने व्यक्त केल्या भावना

नुकतेच मुंबईमध्ये नव्या मेट्रो लाइनचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दक्षिण मुंबईमधील अंधेरी ते दहिसर अशी मार्गक्रमण करणारी ही मेट्रो आता सर्वसामान्य लोकांसाठी देखील खुली झाली आहे. त्यामुळे या नवीन मेट्रोमधून प्रवास करायचा आनंद लोकांसोबतच अनेक सेलिब्रिटी देखील घेताना दिसत आहे. नुकताच अभिनेता सुमित राघवनने या मेट्रोमधून प्रवास करत त्याचा अनुभव आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अभिनेता सुबोध भावेने देखील या मेट्रोमधून पत्नीसोबत प्रवास केला आहे. त्याचा व्हिडिओ शेअर करत त्याने मेट्रोचे कौतुक आहे.

सुबोधने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत असून तो म्हणतो, “नमस्कार. मी आता मुंबईतील नव्या मेट्रो मध्ये आहे. आम्ही कांदिवलीला गेलो होतो आणि तिथून घरी जाण्यासाठी आम्ही मेट्रोमधून प्रवास करतोय. खूप छान वाटत आहे. खूप खूप धन्यवाद मुंबईकरांचा प्रवास सुखकर केल्याबद्दल. कांदिवलीहून आमच्या घराजवळ असणाऱ्या स्टेशनवर आम्ही फक्त १५ मिनिटात पोहोचलोय. खालून जाणाऱ्या, ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या सगळ्या जागा मला दिसतायत. प्रत्येकवेळी गाडी घेऊन जाताना आम्ही सतत ट्रॅफिकमध्ये अडकत होतो पण आता तशी भीती नाहीये. मुंबईकरांनो याचा वापर करा. फार सुंदर आहे. मुंबई मेट्रो खूप धन्यवाद. इतरही ज्या मेट्रो आहेत त्या लवकरात लवकर सुरू व्हाव्यात. उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.”

पुढे सुबोध म्हणाला, “खुप दूर राहणाऱ्या लोकांना मुंबई शहराशी जोडणारी ही मेट्रो आहे. त्यांना याचा सगळ्यात जास्त फायदा व्हावा जे दररोज उठून फार लांबचा प्रवास करतात ट्रॅफिकमधून धक्के खात कामावर येतात. त्यांना याचा उपयोग व्हावा. प्रार्थना करतो की सगळ्या मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हाव्यात.’ यासोबतच सुबोधने सगळ्यांना मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहान देखील केले आहे. सोबत नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ सिनेमा ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो पाहावा असे देखील त्याने व्हिडिओच्या शेवटी सर्वांना सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हनीमूनबाबत फॅनने शाहरुखला विचारला हा अजब प्रश्न, किंग खानच्या उत्तराने चाहत्याची बोलतीच बंद

शाहरुखचा जुना फोटो पोस्ट करून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न, पाहा कसे दिले अभिनेत्याने चोख प्रत्युत्तर

हे देखील वाचा