क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी २३ जानेवारी रोजी खंडाळा येथे लग्न केले. मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अतिशय कमी आणि जवळच्या लोंकाच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. सध्या या दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकरी कमेंट्स करत त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत. या लग्नाला अगदी मोजकी मंडळाची उपस्थित होती. बॉलिवूड किंवा क्रिकेट जगतातून कोणीही मोठी असामी लग्नात सामील झाली नाही. मात्र अथिया आणि राहुल यांना त्यांच्या लग्नाचे एकापेक्षा एक महागडे असे गिफ्ट्स सध्या मिळत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांनाही त्यांच्या लग्नाची भेट म्हणुन काही कोटींची गिफ्ट्स मिळाली आहेत.
View this post on Instagram
अथिया शेट्टी आणि राहुलला जवळच्या लोकांकडून मोठमोठ्या वस्तू भेट स्वरूपात मिळाल्या आहेत. सुनील शेट्टीने लेक आणि जावयाला एक ५० कोटींचा आलिशान फ्लॅट गिफ्ट दिला असून, सलमान खानने त्यांना १.५० कोटी रुपयांची ऑडी कर भेट दिली आहे. सुनील शेट्टीचा जवळचा मित्र आणि अभिनेता जॅकी श्रॉफने नवं दांपत्याला ३० लाखांचे घड्याळ गिफ्ट केले आहे. तर अर्जुन कपूरने त्याची खास मैत्रीण असलेल्या अथियाला १.५ कोटींचे डायमंड ब्रेसलेट दिले आहे. तर केएल राहुलला त्याचा मित्र असलेल्या विराट कोहलीने २.१७ लाखाची बीएमडब्ल्यू कर गिफ्ट केली आहे. तर महेंद्रसिंग धोनीने राहुलला ८० लाखांची कावासाकी निंजा बाइक दिली आहे.
अथिया आणि केएल राहुलला मिळणाऱ्या माहितीनुसार एकूण ५६ कोटींचे गिफ्ट्स मिळाले आहे. सामान्य माणसाच्या बाजूने विचार केला तर त्याला एवढे पैसे कमवायला १४०० वर्ष लागतील. तत्पूर्वी २३ जानेवारी रोजी लग्न झालेल्या अथिया आणि राहुलने आयपीएलनंतर रिसेप्शन देण्याचे ठरवले आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक हस्ती उपस्थित असतील.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…