Tuesday, December 23, 2025
Home बॉलीवूड दु:खद! एनटीआर आणि नागेश्वर राव सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

दु:खद! एनटीआर आणि नागेश्वर राव सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

नुकंतच मनोरंज सृष्टीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 50-60 च्या दशकात तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. शुक्रवार (दि, 27 जानेवारी) रोजी त्यांनी जागाचा निरोप घेताल. जमुना या 86 वर्षाचा होत्या.

ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांनी वयाच्या 86 व्या वर्षी राहरत्याघरी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनाची माहिती कुटुबिंयानी दिली. तेलुगू, तामिळ, कन्नड आणि हिंदी भाषेतील सुमारे 200 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या जमुना यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. जमुना यांच जन्म कर्नाटकातील हम्पी येथे (दि,30 ऑगस्ट 1936) रोजी झाला होता. मात्र, त्यांचे आई-वडील निप्पानी श्रीनिवास राव आणि कौसल्या देवी आंध्र प्रदेशात गेले. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गुंटूर जिल्ह्यातील दुग्गीराला येथे घेतले आणि शालेय जीवनात ती त्या एक रंगमंच कलाकार होत्या.

जमुना यांनी वयाच्या 16 व्या वर्षीच गरिकापरी राजाराव दिग्दर्शित पुट्टील्लू (1953) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र, त्यांना खरी ओळख एल.व्ही. प्रसाद यांच्या (1955) मध्ये प्रदर्शित ‘मिसम्मा’ चित्रपटाने मिळाली. एन.टी. रामाराव, सावित्री आणि अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या प्रमुख भूमिकांसह त्यांनी या चित्रपटात सहाय्यक पात्र साकारले होते. चार दशकांच्या कारकिर्दीत, त्यांनी विविध भूमिका साकारल्या आणि त्यांच्या काळातील या दिग्गज अभिनेत्यांसह इतर शीर्ष अभिनेत्यांसह अभिनय केला होता.

‘मिस मेरी’, ‘बेटी बेटे’, ‘मिलन’, ‘दुल्हन’, ‘एक राज’, ‘रिश्ते नाते’ हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट. प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री जमुना यांनी दाक्षिणात्य निर्मिती संस्थांनी तयार केलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या होत्या. जमुना यांना ‘मिलन’ या चित्रपटासाठी 1968 साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रींचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मराठीसोबतच हिंदीमध्ये यश मिळवलेल्या श्रेयश तळपदेने दिला आहे ‘या’ साऊथ सुपरस्टार अभिनेत्याला आवाज
पठाण चित्रपट पाहून हृतिक रोशन भारवला, पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘पूर्वी असं कधी…’

हे देखील वाचा