बॉलिवूड कलाकार आणि लोकांसाठी खरा हिरो म्हणून उदयास आलेला सोनू सूद सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदची फॅन फॉलोइंग इतकी आहे की, प्रत्येकजण अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतं. आपल्या आवडत्या अभिनेत्याला खूश करण्यासाठी चाहतेही कायम काहीना काहीना खास करीत असतात. अलीकडेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त सोनू सूदच्या एका चाहत्याने त्याला एक अतिशय सुंदर सरप्राईज देऊन आश्चर्यचकित केले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, चला तर मग जाणून घेऊया सोनू सूदला काय गिफ्ट मिळाले आहे…
प्रजासत्ताक दिनानिमित्त, महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात सोनू सूद (sonu sood) याच्या एका चाहत्याने अभिनेत्याचे 87,000 चौरस फुटांचे पोर्ट्रेट बनवले आहे. सोनू सूदचे चाहते आणि चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर यांनी उद्यानात हे चित्र साकारण्यासाठी 7 टनांहून अधिक रांगोळी रंगांचा वापर केला आहे. ते बनवायला विपुलला खूप वेळ लागला. चाहत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, ‘मला यावेळी नम्रतेचे जाणीव हाेत आहे… सर्वात मोठ्या रांगोळीचा विश्वविक्रम. 87000 चौ.फू. 7 टन रांगोळी रंग.
View this post on Instagram
चाहत्यांनी बनवलेल्या या रांगोळीबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला, ‘मी शब्दांच्या पलीकडे आहे आणि लोकांनी दाखविलेल्या प्रेमापुढे मी नम्र झालो आहे, मी सोलापूरच्या विपुलचे आभार मानतो, ज्याने 87,000 चौ. सर्वात मोठी रांगोळी काढली. मला त्याचा अभिमान आहे.’
अभिनेता साेनू सूद याच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर अभिनेत्याने ‘हॅपी न्यू इयर’, ‘रमैया वस्तावैया’,’एक विवाह ऐसा भी’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले.(bollywood actor sonu sood fan gifted him 87000 sq ft portrait of actor with rangoli making it world bigges on republic day)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘वाटतंय की हा देश आता वेड्यांच्या…’, पठाण चित्रपटाची वाढती गर्दी पाहून माजी न्यायधीश संतापले
याला काय अर्थ! केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाला मिळणाऱ्या भेटवस्तू फक्त अफवाच, मोठा खुलासा










