प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हरची मुलगी जेमी लिव्हर विनोदात अव्वल असण्यासोबतच, गाणे आणि अभिनयातही माहिर आहे. ती दरदिवशी तिचे विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते असते. हे पाहिल्यानंतर सगळेचजण हसून हसून बेहाल होतात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सर्व बाबींव्यतिरिक्त जेमी लिव्हर डान्समध्येही एक नंबर आहे. जेमीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अक्षय कुमारच्या ‘भूतनी के’ गाण्यावर रोहित जेठवानीसोबत डान्स करताना दिसत आहे.
जेमी लिव्हरचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि चाहते तिच्या डान्सचे कौतुकही करत आहेत. हा तिचा व्हिडिओ शेअर करत जेमीने लिहले, “हो आज आनंदाचा दिवस आला आहे.” ती ज्याप्रकारे नाचत आहे ते सर्व अगदी पाहण्यासारखे आहे. जेमीच्या डान्स व्हिडिओला आतापर्यंत 27 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
एका सोशल मीडिया युजरने तिच्या या इंस्टाग्राम रील व्हिडिओवर कमेंट करत लिहले की, “तुमचे एक्सप्रेशन्स जरा जास्तच झाले, अन्यथा डान्स खूप चांगला आहे.”
जेमी लिव्हर ही प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हरची मुलगी आहे. पण आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे, हे सांगणे चुकीचे ठरणार नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जेमीला लाखो लोक फॉलो करतात आणि तिच्या व्हिडिओंवर कमेंट देखील करतात.
विशेष म्हणजे जेमीने चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती ‘किस किसको प्यार करू’ आणि ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-