Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

“देशामध्ये फक्त सेक्स आणि शाहरुख खानच विकला जातो”, नेहा धुपियाचं विधान चर्चेत

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं आणि आता प्रदर्शनानंतर तर बॉक्सऑफिसवर राडाच घातला आहे. अवघ्या दोन-तीन दिवसात चित्रपटाने 300 कोटींचा गल्ला जमवला आहे. पुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. अनेक कलाकारांनी शाहरुखचं आणि त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. अशताच अभिनेत्र नेहा धुपिया हिने देखिल शाहरुखचं गुणगाण गात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia ) हिने इंडस्ट्रीमधील अनेक गाजणाखऱ्या चित्रपटांमध्ये काम करुन वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभनेत्री अभिनयापेक्षा जास्त रियालीटी शो आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते. सध्या अभिनेत्री आपल्या कार्यक्रमांमुळे नाही तर जुन्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

शाहरुखच्या पठाण चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत असून मध्येच नेहाच्या ट्वीटने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. गेल्या दोन दशकापूर्वी नेहाने शाहरुख खानबद्दल एक ट्वीट शेअर केलं होतं ज्यावर अभिनेत्रीने (दि, 28 जीनेवारी 2023) रोजी प्रतिक्रिय देखिल दिली आहे. सोशल मीडियावर एका चाहत्याने नेहाच्या जुन्या ट्वीटला पुन्हा एकदा शेअर केलं आहे, ज्यामध्ये नेहाने लिहिले होते की, “फक्त सेक्स आणि #शाहरुख खानच विकत आहे, आणि हे आजही सत्य आहे. #Pathaan #Pathaan100crWorldwide #PathaanRoars.”

एका मुलाखतीदरम्यान नेहा धूपियाने शाहरुख खान बद्दल ही गोष्ट सांगितली होती, या देशात फक्त सेक्स आणि शाहरुख खानच विकला जात आहे. एका युजरच्या ट्वीटवर नेहाने प्रतिक्रिय देत लिहिले की, “20 वर्षानंतर, माझं वक्तव्य खरं झालं आणि हे अ‍ॅक्टरचं करिअर नाही, तर एका राजाचं शासन आहे! #KingKhan @iamsrk.”

नेहाच्या करिअरबद्दल सांगायचे झाले तर नेहा धुपिया बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एका मुलाखतीदरम्यान नेहाला विचारले होते की, ‘चित्रपटांमध्ये सर्वात जास्त काय विकलं जातं, ज्यामध्ये शाहरुख खान उपस्थित होता…?’ त्यावेळी अभिनेत्रीने वादग्रस्त विधान केलं होतं की, “फक्त शाहरुख खान आणि सेक्स विकलं जातं. पाहायला गेलं तर नेहा देखिल शाहरुख खानची मोठी फॅन आहे. तिने भले शाहरुखा खान सोबत काम केलं नाही मात्र, ती देखिल बाकींच्या ताहत्यांप्रमाने मोठी चाहती आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लाल रंगाचा टीशर्ट आणि हातामध्ये कुत्र, खूपच रंजक आहे अनुप खेर आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी…
आईच्या निधनानंतर ‘भाईजान’च्या नावाने राखीनं फोडला हंबरडा, सलमानचं नाव घेत ढसाढसा रडली अभिनेत्री

हे देखील वाचा