Sunday, February 23, 2025
Home अन्य मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

मराठी मनोरंज विश्वातील सर्वांचाच लाडका अभिनेता अंशुमन विचारे याने आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अंशुमन आपल्या अभिनयासोबतच सोशल माडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे अंशुमनने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. त्याने सोलापूरमध्ये घडलेल्या एका कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

अंशुमन विचारे (Anshuman Vichare) याने चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकासाठी देखिल ओळखला जातो. अंशुमन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘वाकडी तिकडी’ या नाटकाच्या दौऱ्यावर असतो. अशातच शुक्रवार (दि, 27 जानेवारी) हा दौरा सोलापुरमधील हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी असे काही घडले की, ज्यामुळे दिव्यांग ज्येष्ठ रंगकर्मी गुरु वठारे यांना झाडू घेऊन पुर्ण मंच झाडून काढला ज्यामुळे अंशुमनने प्रशासनाला जाब विचारत संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.

त्याशिवाय अंशुमनने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. सोलापुरमधील हुतात्मा स्मृती मंदिरात अंशुमनचा ‘वाकडी तिकडी’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार होता मात्र, त्यादिवशी पूर्वीच शाळेतील काही कार्यक्रम पार पडले होते. हे कार्यक्रम पार पडल्यानंतर मनपा व्यवस्थापण आणि सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत ठेकोदारांचा वाद झाला आणि ठेकेदाराने मला “हे काम परवडत नाही”, असं म्हणत काम बंद करुन निघून गेला. यांच्यामध्ये झालेला वाद पाहून जवळचे दिव्यांग ज्येष्ठ रंगकर्मी गुरु वठारे (Guru Vathare) यांनी एका क्षणाचाही विलंब न करता लगेच हातामध्ये झाडू घेऊन सगळा मंच झाडून काढला.

अंशुमनने घडलेल्या कृत्याचा व्हिडिओ शेअर करत गुरु वठारे यांचे हे कृत्या पाहून थेट प्रशासनाला जाब विचारला असून या प्रकरणात लक्ष घाला अशी विनंती केली आहे. कोणताही विचार न करता कुठल्याही प्रकारची गैर सोय होऊ नये आमि नाटाकाच्या प्रयोगामध्ये अडथळा नको म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आता सर्वत्र त्यांच्या कर्तुत्वाचं कौतुक होत आहे. मात्र, प्रशासनाचे गलथाने पाहून मनपाच्या कामावर ताशेरे ओढले जात आहेत. या गलथान कारभारामुळे कलाकारांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय अशी खंतही सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग न्यूज! गायक कैलास खेर यांच्यावर कॉन्सर्ट दरम्यान हल्ला
ब्ल्यु क्वीन! इशिता दत्ताचा बार्बी लूक चाहत्यांना करतोय घायाळ

हे देखील वाचा