Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड तब्बल पाच वर्षांनी दीपिका पदुकोणचा सिनेमा झाला हिट, भावनिक होत म्हटले शाहरुखला धन्यवाद

तब्बल पाच वर्षांनी दीपिका पदुकोणचा सिनेमा झाला हिट, भावनिक होत म्हटले शाहरुखला धन्यवाद

‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहाम अभिनित पठाण सिनेमाने अनेक रेकॉर्ड कायम केले. दीपिकाचा पाच वर्षांपूर्वी ‘पद्मावत’ हा सिनेमा याच दिवशी प्रदर्शित झाला होता. आता पठाण देखील २५ जानेवारीलाच प्रदर्शित झाला. या मधल्या पाच वर्षांमध्ये दीपिकाचे ‘छपाक’, ‘गहराइयां’, ’83’ हे सिनेमे आले, मात्र तिघेही फ्लॉप ठरले. तब्बल पाच वर्षांनी दीपिकाने तिचा सिनेमा हिट होताना पाहिला. मुंबईमध्ये पठाण यशस्वी झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. या कार्यक्रमाला आल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पाहून दीपिकाला तिचे अश्रू अनावर झाले. तिने सर्वांना धन्यवाद म्हटले. 

दीपिकाने या कार्यक्रमात सांगितले, “प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही कोणतेही रेकॉर्ड तोडायला नाही निघालो. आम्ही फक्त एक चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. आणि हेच शाहरुखने मला माझ्या पहिल्या ‘ओम शांती ओम’ सिनेमाच्या वेळी शिकवले. तेव्हा मला चित्रपटांबद्दल जास्त माहिती नव्हती. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासोबत शूटिंग करायची मजा काही वेगळीच असते. काम करताना एक कम्फर्टझोन बनतो. आणि हाच झोन आमच्या कामात दिसतो आणि त्या चित्रपटासोबत दर्शक जोडले जातात.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी सोबत ‘ओम शांति ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘पठान’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पुढे दीपिका म्हणाली, “शाहरुख सोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच मस्त असतो. आम्ही चार चित्रपटांमध्ये सोबत काम केले. मात्र प्रत्येक चित्रपटात आमची केमिस्ट्री वेगळी होती. तिला सर्वांनीच पसंती दिली. त्याच्यासोबत काम करून माझ्यामध्ये एक आत्मविश्वास आला आहे. जर शाहरुखने मला ‘ओम शांती ओम’मध्ये संधी दिली नसती तर आज मी इथे नसती.” हे सांगताना दीपिका खूपच भावुक झाली.

तत्पूर्वी पठाण या सिनेमात दीपिकाचा ऍक्शन अवतार सर्वाना पाहायला मिळत आहे. शाहरुख खानने देखील दीपिकाच्या ऍक्शनची स्तुती केली. सोबतच तिच्या आगामी फायटर सिनेमात ऋतिक रोशन नाही तर दीपिका फायटर असल्याचे देखील सांगितले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

मेहेंदी सजली! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हातावर सजली सुमितच्या नावाची मेहेंदी

हे देखील वाचा