मागील अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका त्यात असणाऱ्या कलाकारांमुळे, मालिकेतील ट्विस्टमुळे, लोकप्रियतेमुळे आदी अनेक सकारात्मक गोष्टींमुळे चर्चेत असायची. मात्र मधल्या काही काळापासून अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली, आणि त्यांनी मालिकेवर निर्मात्यांवर विविध आरोप केले तेव्हापासून ही मालिका सतत वादांमध्ये आहे. रोज मालिकेवर आणि निर्मात्यांवर नवीन आरोप होत आहे.
यातच मालिकेत आधी तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर असित मोदी यांच्यावर नुकताच त्यांचे पेमेंट थकवल्याचा सनसनाटी आरोप केला. या आरोपांमुळे सगळीकडे खूपच चर्चा रंगली. मात्र आता शैलेश लोढा यांच्या या आरोपावर मालिकेकडून आणि निर्मात्यांकडून स्पष्टीकरण देत त्यांना त्यांच्या आरोपावर उत्तर देण्यात आले आहे. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर नेहमीच निर्मात्यांवर विविध आरोप केले. त्यातच त्यांनी त्यांचे जवळपास एक वर्षांपासून पेमेंट मिळाले नसल्याचे सांगितले. यावर टीमकडून सांगण्यात आले की, ‘हो आम्ही अजूनपर्यंत त्यांचे पेमेंट नाही दिले कारण त्यांना मालिका सोडल्यानंतर अनेकदा आम्ही फोन केला आणि त्यांचे जे ड्यूज पेंडिंग आहे त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी अजूनपर्यंत आमच्याशी संपर्क साधला नाही. यामुळे त्यांचे पैसे देणे बाकी आहे.” प्राप्त माहितीनुसार मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने अनेकदा शैलेश यांना संपर्क केला, मात्र त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिले आंही आणि त्यांच्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या नाही, म्हणूनच त्यांचे ड्यूज पेंडिंग आहे.
रिपोर्ट्सनुसार टीमच्या एका सदस्याने सांगितले की, “प्रत्येक कंपनीची आपली अशी एक सिस्टम असते आणि लोकांना त्यानुसार काम करावे लागते. त्यांना कंपनीचे सर्व नियम पाळावे लागतात आणि फॉलो करावे लागतात. आम्ही अजूनपर्यंत कोणाचेही पैसे बाकी ठेवले नाही. शैलेश यांना देखील त्यांचे पेंडिंग पेमेंट मिळेल मात्र त्यांना सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून पेपरवर सही करावी लागेल.”
तर या शोचे प्रोजेक्ट हेड असलेल्या सोहेल रहमानी यांनी देखील दावा केला आहे की, “शैलेश लोढा यांच्याशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांनी आम्हाला सहयोग दिला नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीसोबत काम करतात तेव्हा त्यांच्या प्रोसिजर तुम्हाला फॉलो कराव्या लागतात.” आता यावर शैलेश लोढा यांच्याकडून काय स्पष्टीकरण येते ते पाहावे लागेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
आईच्या निधनानंतर रडताना दिसली राखी सावंत; म्हणाली, ‘माझं लग्न धोक्यात…’
अमृता अरोरा चेहरा लपवत पार्टीतून पडली बाहेर; युजर्स ट्राेल करत म्हणाले, ‘तोंड लपवावे…’