Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या शो व्यतिरिक्त, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करण्यासाठीही चर्चेत असते. ती सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. परंतु जेनिफर जेव्हा तिचे फोटो शेअर करते, तेव्हा ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात.

जेनिफर विंगेटचे काही बोल्ड फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियाचा पारा वाढवत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री तिचा एक खास टॅटूही दाखवित आहे, ज्याची बरीच चर्चा होत आहे. वास्तविक, जेनिफरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मल्टीकलर स्विमसूटमध्ये दिसली आहे. या स्विमसूटमध्ये चाहत्यांना तिची बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली आहे.

या फोटोंपैकी एका फोटोमध्ये जेनिफर तिचा खास टॅटूसुद्धा दाखवताना दिसत आहे. हा टॅटू तिच्या पाठीवर आहे, ज्यावर ‘हकुना मटाटा’ लिहिलेले आहे. ‘हकुना मटाटा’ पूर्व आफ्रिकेतील एक स्वाहिली भाषेतील वाक्य आहे, ज्याचा अर्थ ‘काही त्रास नाही’, किंवा ‘काहीही चिंता नाही’ असा होतो. आता जेनिफरचे हे सर्व बोल्ड फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीचे अनेक चाहते आणि सर्व सोशल मीडिया युजर्सला तिचे फोटो आणि विशेष म्हणजे टॅटू खूपच आवडला आहे. तसेच चाहते पोस्टवर कमेंट करत आपले प्रेम व्यक्त करत आहेत. जेनिफर विंगेट ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे. तिने ‘बेहद’, ‘बेपनाह’, आणि ‘सरस्वतीचंद्र’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बेहद’मधील जेनिफरची भूमिका विशेष गाजली. यात तिने ‘माया’ची भूमिका साकारली होती. तसेच यातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. एवढंच नाही, तर जेनिफर वेब सीरिजमध्येही अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

जेनिफर विंगेटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच तिच्या बहुचर्चित वेब सीरिज कोड एमच्या दुसर्‍या सत्रात दिसणार आहे. दुसर्‍या सिझनची घोषणा या वर्षाच्या सुरूवातीलाच करण्यात आली होती. ‘अल्ट बालाजी’ आणि ‘झी 5’ च्या या वेब सीरिजद्वारे जेनिफर पुन्हा ‘मेजर मोनिका मेहरा’च्या भूमिकेत परतणार आहे. ही माहिती स्वतः जेनिफरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

-‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

हे देखील वाचा