Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शैलेश लोढा यांना भगव्या वस्त्रांमध्ये पाहून चाहते थक्क; भक्तीत तल्लीन झालेला दिसला अभिनेता

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ फेम अभिनेता शैलेश लोढा याने आपल्या खास अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच शैलेश लाेढा शो मेकर्सवर फीस न दिल्याचा आरोप करून चर्चेत आला हाेता. अशात आता सोशल मीडियावर एक लेटेस्ट फोटो शेअर करून अभिनेत्याने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.  फाेटाेमध्ये शैलेशला भक्तीमध्ये तल्लीन हाेताना पाहून चाहते भिन्नभिन्न प्रतिक्रिया देत आहेत आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये परत येण्याची विनंती करत आहेत.

खरंतर शैलेश लोढा (shailesh lodha ) यांने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शैलेश  भगव्या रंगाचे धोतर परिधान केलेला दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्याने कपाळावर टिका व भस्म लावले असून गळ्यात फुलांची माळ घातली आहे. हे फाेटाे पाहूण शैलेश कुठल्यातरी मंदिरात असल्याचं समजत आहे. शैलेशने हे फाेटाे शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्हाला मनाची शक्ती द्या, मन विजयी करा…’

शैलेशला या अवतारात पाहून चाहते ‘जय हो’, ‘ओम नमः शिवाय’, ‘जय श्री राम’ लिहित आहेत. एका चाहत्याने कमेंट करत विचारले की, ‘महाकाल मंदिरात आहे का?’ तर एकाने लिहिले की, ‘तुम्ही गुणांनी परिपूर्ण आहात, तुम्ही लेखक आहात, तुम्ही कवी आहात, तुम्ही अभिनेता आहात आणि तुम्ही काय आहात, सर, तुम्ही एक अद्भुत कलाकार आहात’. तर अनेक चाहते शैलेशला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये परत येण्याची विनंती करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

काही दिवसांपूर्वीच कवी शैलेश लोढा यांनी निर्मात्यांवर त्याची फीस न भरल्याचा आरोप केला हाेता. शैलेश लोढा याच्या म्हणण्यानुसार, ‘ते निर्मात्यांच्या सतत संपर्कात आहेत, परंतु त्यानंतरही त्याला त्याची फीस अद्याप मिळालेली नाही.’ शैलेशच्या आरोपावर, शोचे प्रोजेक्ट हेड सुहेल रमाणी यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, अभिनेत्याने एग्जिट फॉर्मेलिटी पूर्ण केली नाही, त्यामुळे त्याचे शिल्लक फीस थांबवण्यात आले आहे.(tv actor shailesh lodha in devotional look fans reacted and demand to comeback on show taarak mehta ka ooltah chashma )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
राज कुंद्रा चेहरा लपवत पोहोचला शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टीत; व्हिडिओ व्हायरल

जान्हवी तमिळ चित्रपटातून साऊथमध्ये ठेवणार पाऊल? वडील बोनी कपूर यांनी सांगितले व्हायरल बातमीचे सत्य

हे देखील वाचा