Friday, August 8, 2025
Home टेलिव्हिजन काय तो राग! उर्फी जावेदने रागाच्या भरात हेयर स्टायलिस्टच्या तोंडावर फेकले पाणी, व्हिडिओ व्हायरल

काय तो राग! उर्फी जावेदने रागाच्या भरात हेयर स्टायलिस्टच्या तोंडावर फेकले पाणी, व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर तिच्या विविध विचित्र कपड्यांमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असते. उर्फी तिचे कपडे, स्टाईल आणि फॅशन्सन्समुळे सतत लाइमलाइट मिळवत असते. अनेकदा किंबहुना नेहमीच तिला तिच्या कपड्यांवरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. मात्र तरीही ती काही मागे फिरत नाही. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे उर्फी चिडलेली दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये ती तिच्या हेयर स्टायलिस्टवर चिडलेली दिसत आहे. ती त्याला बोलते आणि नंतर त्याच्या अंगावर आणि तोंडावर पाणी फेकून मारते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी आता उर्फीला ट्रोल करत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये उर्फी आरशासमोर बसलेली दिसत आहे. ती तिच्या मेकअप टीमसोबत असून, यातच ती रागाने तिच्या स्टायलिंग टीमवर ओरडते आणि म्हणते, “तुम्ही हसत आहात आणि इथे माझे डोके खराब होत आहे. यातच तिच्या हातात एक पाण्याची बाटली असते. तो ओरडत ओरडत हाताला बाटलीतून पाणी हेयर स्टायलिस्टच्या तोंडावर फेकते.

हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर शेवट लक्षात येते की, उर्फीने तिच्या हेयर स्टायलिस्टसोबत हा एक प्रॅन्क केला होता. हा व्हिडिओ प्रॅन्क असूनही उर्फीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. उर्फी आताच ट्रोल होते असे नाही. तिला अनेह्मीच तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या वक्तव्यांवरून सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. उर्फी अतिशय विचित्र आणि कल्पनेपलीकडील कपडे परिधान करत जगासमोर येते तिचे असे अतरंगी कपड्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

हे देखील वाचा