Thursday, November 13, 2025
Home भोजपूरी मोनालिसा आणि पवन सिंग यांच्या ‘या’ जुन्या गाण्याने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, मिळवले मिलियन व्ह्यूज

मोनालिसा आणि पवन सिंग यांच्या ‘या’ जुन्या गाण्याने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, मिळवले मिलियन व्ह्यूज

भोजपुरी इंडस्ट्री ते टेलिव्हिजन इंडस्ट्री असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा. आज मोनालिसाच्या कोणत्याही खास परिचयाची ओळख नाही. तिने तिच्या डान्सने, अभिनयाने आणि बोल्ड लुक्सने सर्वांची मने जिंकून घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत फँनच्या संपर्कात असणाऱ्या मोनोलिसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मोनालिसा अचानक चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तिचे जुने व्हायरल होणारे गाणे. हो सध्या तिचे सोशल मीडियावर एक जुने तुफान व्हायरल होत आहे.

मोनालिसाला तिचे भोजपुरी फॅन्स खूपच मिस करत असून, तिच्या आठवणींमध्ये ते तिचे जुने गाणे बघत आहेत. मोनालिसा जेव्हापासून बिग बॉसमध्ये गेली तेव्हापासून ती भोजपुरी सिनेमाकडे फिरकलीच नाही. मागील काही वर्षांपासून ती फक्त टेलिव्हिजन विश्वात रमत आहे. सध्या पवनसिंग आणि तिचे जुने गाणे व्हायरल होत आहे. हे गाणे ५ वर्षांपूर्वीचे वेव्ह म्युझिक यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले होते.

व्हायरल होणाऱ्या पवन सिंग आणि मोनालिसाच्या गाण्याचे नाव आहे, ‘गोर करिया’, या गाण्याच्या ओरिजनल व्हर्जनने तर धुमाकूळ घातला असून, सोबतच याच्या डीजे रिमिक्सने देखील धमाका केला आहे. ओरिजनल गाण्याने २७ मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले असून, त्याच्या डीजे रिमिक्सने देखील ८० मिलियन व्ह्यूजचा मोठा टप्पा गाठला आहे. सतत विविध पार्ट्यांमध्ये हे गाणे ऐकण्यास येत आहे.

पवन सिंग आणि मोनालिसा यांची या गाण्यातील केमेस्ट्री कमालीची सुंदर दिसत आहे. गाण्यात मोनालिसाने मिनी स्कर्ट घातला असून, ती दमदार डान्स करताना दिसत आहे. तिचे हे गाणे ‘सरकार राज’ या अल्बमचे असून, गाण्याला पवन सिंग आणि हनी बीने गायले आहे. तर मनोज मतलबीने या गाण्याचे शब्द लिहिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

हे देखील वाचा