बॉलिवूड मधील महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचे चाहते संपूर्ण जगात पसरेल आहेत. त्याच्या अभिनयासोबतच त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय असतो. आज वयाची ऐंशी वर्ष ओलांडूनही अमिताभ बच्चन यांचा चार्म कायम आहे. त्याना या इंडस्ट्रीमध्ये काम करून आज पन्नास पेक्षा अधिक वर्ष झाली असली तरी ते आजही त्याच उमेदीने काम करतात. त्यांनी नेहमीच वर्तमानाशी जुळवून घेतले. त्यामुळेच आज ते सोशल मीडिया देखील मोठ्या उत्साहाने वापरतात. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना तुफान फॅन फॉलोविंग आहे.
View this post on Instagram
नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते उंटावर बसलेले दिसत असून, त्यांनी या फोटोसोबत एक आठवण देखील शेअर केली आहे. त्यांचा हा फोटो एका सिनेमाच्या सेटवरचा असून, त्या सेटवरची एक आठवण सांगत त्यांना त्यांच्या उंचीमुळे ‘उंट’ म्हणून चिडवायचे. त्यानी या फोटोसोबत लिहिले, “हा फोटो १९६९ चा मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा लोकं मला ऊंट म्हणायचे. त्यानंतर मी ठरवलं की मी हे आता खर करूनच दाखवणार. मग मी एका ऊंटावर चढून बसलो. हा फोटो माझ्या दुसऱ्या सिनेमाचा ‘रेश्मा आणि शेरा’चा आहे. हे ठिकाण जैसलमेरपासून बऱ्यापैकी दूर पोचीना आहे. आता एक चांगले आहे की मला कुणी ऊंट म्हणत नाही.”
अमिताभ बच्चन यांनी या कॅप्शनसोबत अनेक फनी इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर नेटकरी अनेक कमेंट्स करत असून, अनेकांनी त्यांना या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एकाने लिहिले, “बरोबर आहे तुम्हाला उंट म्हणतात. जसे उंट वाळवंटात न थकता उंचीवर जात आपले काम करतो, तसेच तुम्ही देखील बॉलिवूडमध्ये न थकता वेगवेगळ्या उंची गाठत आहात.” त्याचा हा फोटो आता चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर भरभरून कमेंट्स येत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोनालिसा आणि पवन सिंग यांच्या ‘या’ जुन्या गाण्याने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, मिळवले मिलियन व्ह्यूज
अनुपम खेर यांना करोडोंची कार सोडून ऑटोमध्ये करावा लागला प्रवास; म्हणाले, ‘काहीही होऊ शकते’










