तारक मेहता का उलटा चश्मा हा प्रेक्षकांचा सर्वात आवडता शो आहे. नेहमी टीआरपीमध्ये टॉपला असणारा हा शो दर्शकांना हसवण्याचा काम करतो. मागील १३ वर्षांपासून शो प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. मात्र काही दिवसांपासुन सतत शोमधील लोकप्रिय कलाकार शोला सोडून जात असल्यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. शोमधील कलाकार सोडून गेल्यानंतर त्यांच्या जागी नवीन कलाकार देखील येत आहे. आता नुकतीच शोमध्ये नवीन ‘टप्पू’ची एन्ट्री झाली आहे. गडा कुटुंबाचा कुलदीपक असणारा टप्पू मागील अनेक दिवसांपासून शोमध्ये दिसत नव्हता. त्यानंतर आता पुन्हा शोमध्ये टप्पू ची एन्ट्री झाली आहे.
शोमध्ये आधी अभिनेता राज अनादकट जेठालालच्या मुलाची अर्थात टप्पूची भूमिका साकारत होता. मात्र त्याने डिसेंबर २०२२मध्ये शोला रामराम ठोकला. त्यानंतर आता निर्मात्यांनी अभिनेता नितीश भलूनीला नवीन टप्पूच्या भूमिकेतून लोकांच्या समोर आणले आहे. शोमध्ये आतापर्यंत तिसऱ्या टप्पूने एन्ट्री घेतली आहे. राजने शोमध्ये २०१७ पासून टप्पू ही भूमिका साकारण्यास सुरुवात केली. त्याने डिसेंबरमध्ये शो सोडल्यानंतर आता नसून टप्पू आला आहे. त्याआधी शोमध्ये भव्य गांधी टप्पू भूमिका साकारायची. नवीन टप्पू आल्यानंतर अभिनेते दिलीप जोशी अर्थात जेठालाल यांनी त्यांच्या मुलाचे दणक्यात स्वागत केले आहे.
View this post on Instagram
दिलीप जोशी यांनी नितीशचे स्वागत करताना म्हटले, “आमच्यासाठी टप्पू हाच आहे. नवीन अभिनेता आला आहे, त्याच भूमिकेला साकारण्यासाठी. मी त्याला फक्त शुभेच्छा देऊ इच्छितो.” सोशल मीडियावर आता नवीन टप्पूच्या एन्ट्रीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आता लोकांनी कमेंट्स करत शोच्या कंटेन्टवरून आणि स्टोरी कॉन्सेप्टवरून निर्मात्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी कमेंट्स करत शो बंद करण्याची मागणी केली आहे. एका युजरने म्हटले आहे, “कॉमेडी शो आहे बाबा कोणती सरकारी नोकरी नाही, जी तुम्ही घासतच आहेत.” दुसऱ्याने लिहिले, “आधी दयाबेनला घेऊन या तेव्हाच शो पाहू.” अजून एकाने लिहिले, “इतके कलाकार बदलत आहेत तर शोचं बदला.”
हे पहिल्यांदाच झाले असे नाही. याआधी देखील शोमधील अनेक जुन्या कलाकारांना नवीन कळकरांनी रिप्लेस केले आहे. यात तारक मेहता, अंजली मेहता, सोढी, सोनू भिडे आदी अनेक कलाकार नवीन आले आहेत. मात्र तरीही शोची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता या शोमध्ये लोकं दयाबेनला मिस करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ