Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेता संजय कपूरच्या पोरीनं ‘या’ बाबतीत सोनम अन् जान्हवीलाही टाकलंय मागं, लवकरच करणार बॉलिवूड पदार्पण

संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया ही बॉलिवूडमध्ये यायच्या आधीपासूनच सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असायची. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओंमुळे सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय बनते.‌ शनायाचे ग्लॅमरस फोटो पाहून कोणीही घायाळ होईल. तिचा हा ग्‍लॅमरस अंदाज पाहून सगळेजण असे म्हणत आहे की, ती सोनम आणि जान्हवी यांच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे गेलेली आहे. शनायाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

शनायाने आता तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहे. जे चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिने काळया रंगाची मोनोकनी घातली आहे. तसेच तिने या ब्लॅक मोनोकनीसोबत एक जॅकेट देखील घातली आहे. ती या फोटोमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे.

तिच्या फोटोंवर‌ चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने ‘उफ्फ’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. याव्यतिरिक्त बाकीच्या युजर्सनी हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्या‌आधीच शनायाने तिचे एक जबरदस्त फॅन फॉलोविंग बनवून ठेवले आहे. तिच्या वेगवेगळ्या अंदाजाने आणि स्टाईलने ती सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. यासोबतच शनायाचा डान्स सुद्धा त्यांना खूप आवडत आहे.

शनाया कपूरने अभिनेत्री जान्हवी कपूरचा चित्रपट ‘गुंजन सक्सेना’ यामध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. सोबत असतील नेटफ्लिक्स‌ वरील वेब सिरीज ‘फॅब्युलस लाईव्ह ऑफ इंडियन वायुव्य’ यामध्ये देखील तिने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

-घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा