बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी‘ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘गुन गुन‘ हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. अशात आता ‘घर बंदूक बिरयानी’तील आणखी एक गाणं झळकले आहे.
नुकताच ‘घर बंदूक बिरयानी’चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी उपस्थित हाेते. यादरम्यान, या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार, ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी ठेका धरला. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे.’आहा हेरो’ या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.
गाण्यांबद्दल संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, ”चित्रपटातील गाणं हे केवळ गाणं नसून तो कोणाच्या आयुष्याचा प्रवास असतो, भावना असतात. त्यामुळे त्याला संगीतही त्याच धाटणीचे हवे. नागराज सरांसोबत मी याआधीही काम केलं आहे. चित्रपटाच्या छोट्याछोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. संगीतामध्येही त्यांचा तितकाच सहभाग असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपसुकच जुळून येतात.” असे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे म्हणणे आहे. (The wait is over! ‘Aaha Hero’ song from ‘Ghar Banduk Biryani’ released)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…
खळबळजनक! प्रसिद्ध माॅडेलची अवघ्या 28व्या वर्षी हत्या, फ्रीजमध्ये भांड्यात आढळलं डाेकं