Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक बेनी दयालचा अपघात ड्रोन पडल्यामुळे गंभीर जखमी

आजच्या तरुणाईचा आवडता गायक म्हणजे बेनी दयाल. आपल्या आवाजाने त्याने प्रेक्षकांवर जादू पसरवली आहे. अनेक हिट गाणी देणाऱ्या बेनीचे कॉन्सर्ट देखील तुफान गाजतात. अशाच एका कॉन्सर्ट दरम्यान बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक बेनी दयाल जखमी झाला आहे. बेनीचा सध्या चेन्नईमध्ये एक कॉन्सर्ट सुरु होता याच कॉन्सर्टमधे तो जखमी झाला. त्याच्यासोबत झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

बेनी दयाल चेन्नईमध्ये कोसेरतदरम्यान स्टेजवर गाणे गात असताना ड्रोनमुळे जबर जखमी झाला. या अपघाताची माहिती खुद्द बेनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत या अपघाताची माहिती दिली आहे. बेनीने लिहिले, “माझ्या तब्येतीबद्दल चौकशी करण्यासाठी तुम्हा सर्वांना धन्यवाद. लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स सादर करताना, ड्रोन चुकून माझ्या डोक्यावर आदळला गेला, यामुळे माझ्या बोटांना आणि डोक्याला थोडी दुखापत झाली असून, आता सर्व काही सामान्य आहे. मी लवकरच बरा होईल. तुम्ही माझ्यासाठी दाखवलेल्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी खूप धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by BENNY DAYAL (@bennydayalofficial)

बेनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो पुढे म्हणतो, “मला सर्वच गायकासाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. जेव्हा तुम्ही लाइव्ह कॉन्सर्ट करतात तेव्हा तो कार्यक्रम करताना ड्रोन तुमच्या जवळ येणार नाही याची काळजी घ्या. कारण ड्रोनला तुमच्याजवळ अचानक येण्यापासून थांबवता येत नाही. तुम्ही तुमच्यासोबत अशी व्यक्ती ठेवा जी खासकरून ड्रोनवर काम करत असेल त्यावर लक्ष देत असेल ज्याला ड्रोन उडवण्याचा अनुभव असेल. मी विनंती करू इच्छितो की सर्व महाविद्यालये, कंपन्या, शो किंवा कार्यक्रमांच्या आयोजकांनी शक्य असतील तितके कमी ड्रोन वापरावे कारण ते अतिशय धोकादायक आहे.”

बेनीच्या या पोस्टनंतर त्याच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी देखील त्यावर कमेंट्स करत त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला आहे. शिवाय बेनीबद्दल देखील काळजी व्यक्ती केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ

हे देखील वाचा