बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक असणारी सनी लिओनी नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या कुटुंबाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अशातच आता नुकतेच सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या लग्नाच्या वाढदिवशी सनीला डॅनियलकडून एक खास आणि महागडी भेटही मिळाली आहे. यादरम्यानची खास झलक सनीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सनीचा पती डॅनियलने लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीला एक सुंदर आणि महागड्या हिऱ्यांचा हार गिफ्ट म्हणून दिला आहे. हा हार घालून सनीने एक व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोबतच आपल्या पतीला धन्यवाद नोटही लिहिली आहे.
तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आपल्या लग्नाच्या वाढदिवशी मला हिऱ्यांचा हार देण्यासाठी डॅनियल वेबर तुझे खूप खूप धन्यवाद. लग्नाचे १० वर्ष आणि आपल्या आयुष्याचे १३ वर्षे एकत्र घालवणे, खरंच हे एक स्वप्न आहे. कधीही विचार नव्हता केला की, एकत्र आयुष्य घालवण्याचे ते वचन आणि चर्चा आपल्याला एकत्र आयुष्यात इथपर्यंत घेऊन येईल, जिथे आज आपण आहोत. खूप प्रेम!”
खरं तर या व्हिडिओपूर्वी सनीने डॅनियलसोबत आपल्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसानिमित्त एक फोटोही शेअर केला होता. यासोबत तिने लिहिले होते की, “मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते, त्याला लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी प्रार्थना करते की, आपण हे आयुष्य मरेपर्यंत सोबत जगू. तू माझी ताकद आणि हिरो आहेस. खूप प्रेम बेबी.”
सनी आणि डॅनियल मागील १३ वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांनी एकूण ३ अपत्य म्हणजेेच १ मुलगी आणि २ मुले आहेत. मुलीला सनीने दत्तक घेतले होते, जिचे नाव त्यांनी निशा कौर वेबर असे ठेवले आहे. मुलीला दत्तक घेतल्यानंतर सनीने सरोगसीने जुळी मुले नूह आणि अशहर यांना जन्म दिला.
सनीने सन २०१२ साली ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम केले. तिचे ‘बेबी डॉल’ हे गाणे चांगलेच गाजले. याव्यतिरिक्त तिच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साध्या कपड्यांमध्ये सारा अली खानने लावली स्टेजवर आग, पाहा साराचा बिंधास्त डान्स व्हिडिओ
-‘बेबी डॉल’ गाण्यावरील सनीचे ठुमके पाहिले का? मिळालेत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज