Thursday, August 7, 2025
Home मराठी होळी, धूलिवंदन सण साजरे करा पण मुलांवर करा शिवसंस्कार, अंकित मोहन अन् लेकाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रेरित व्हाल

होळी, धूलिवंदन सण साजरे करा पण मुलांवर करा शिवसंस्कार, अंकित मोहन अन् लेकाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रेरित व्हाल

रंगांचा, उत्साहाचा आणि आनंदच सण म्हणजे होळी. वाईट प्रवृत्तीचा नाश करत चांगल्या अंगिकारण्याचा सण म्हणजे होळी. मात्र आजच्या आधुनिक जगात होळी किंबहुना सर्वच सणांना मॉडर्न टच देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या परंपरा, चालीरीती ह्या आजच्या पिढीलच माहित नाही तर ते पुढच्या पिढीला काय सांगणार अशी गत झाली आहे. मनोरंजनविश्वाला अशा आधुनिकीकरणासाठी सर्वात जास्त जबाबदार धरले जाते. मात्र या क्षेत्रात वावरणारे सर्वच कलाकार अथवा लोकं असे आधुनिकीकरण आत्मसाद करतायत असे नाही. अनेकानी आजही आपली पाळंमुळं धरून ठेवली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता अंकित मोहन. 

‘फत्तेशिकस्त’,’फर्जंद’ आणि ‘पावनखिंड’ अशा गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटांमधून आपली छाप सोडणारा अभिनेता म्हणजे अंकित मोहन. मराठीसोबतच हिंदी मालिकाविश्वात तो मोठ्याप्रमाणावर सक्रिय आहे. नुकताच आपण होळी हा सण साजरा केला. अंकितने देखील त्याच्या कुटुंबासह होळीचा सण दणक्यात साजरा केला. मात्र त्याच्या या सणाचे स्वरूप खूपच वेगळे आणि सगळ्यांनाच हेवा वाटणारे होते. अंकितने त्याचा होळीचा सण एक वर्षाच्या मुलासोबत साजरा केला. याचा एक व्हिडिओ अंकितने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकित आणि त्याचा मुलगा रुआनचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असून, अंकितने रुआनला खांद्यावर बसवले असून तो नाचत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

अंकितने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो रुआनला खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नाचत असून यावेळी तो कालकवी असलेल्या महाकवी भूषण यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेली ‘इन्द्र जिमि जृम्भा पर, बाडव सअंभ पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है ! कविता गात आहे. यासोबतच तो महाराजांना रुआनला घेऊन मुजरा देखील घालताना दिसला. यावेळी त्याच्या आणि रुआनच्या चेहऱ्यावर रंग देखील लागलेला होता.

अंकितचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे, “संस्कार शिकवावे लागत नाही ते आपोआप घरातल्या वातावरणातुनच मिळतं..”, दुसऱ्याने लिहिले, “एखादी भूमिका केली आणि सोडून दिली विषय संपला..पण तुम्ही महाराजचे आचार, विचार स्वतःमध्ये एव्हढे भिनवलेत कीं शिवमय झाला आहात तुम्ही. हे आतून यायला लागते सांगून शिकवून नाही येतं.. मनापासून आदर आणि अभिमान. जय शिवराय. अजून एकाने लिहिले, “आपण छत्रपती स्वतः मध्ये भिनवलात पण येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा ते रक्ता रक्तात आणि नसा नसात भिनवण्यास कुठेही कमी पडला नाहीत मनापासून आदर करतो आपला जय भवानी, जय शिवराय.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीला पत्र लिहित चाहता म्हाणाला, ‘जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या….,’
धक्कादायक! अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण, ओळखणे झाले कठीण; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

हे देखील वाचा