Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

आजारी असलेल्या सुलोचना दीदींच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदी सिनेसृष्टीतील आणि मराठी चित्रपटांमधील प्रतिभावान, दिग्गज आणि जेष्ठ अभिनेत्री म्हणजे सुलोचना दीदी. सुलोचना दीदी म्हणजे निरागसता, वात्सल्य, शांत, सुंदर या आणि अशा अनेक सुंदर शब्दांची जणूं व्याख्याच. सिनेमातील अनेक दशकं गाजवणाऱ्या दीदी सध्या चित्रपटांसपासून लांब आहेत. क्वचित त्या कुठे एखाद्या कार्यक्रमाला दिसतात. मात्र मागील काही दिवसांपासून त्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान सुलोचना दीदी आजारी असल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांनी तडक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून त्या उपचार घेत असलेल्या रुग्णालयात आर्थिक मदत केली आहे. सोबतच त्यांनी त्यांच्या टीमला आणि प्रशासकीय लोकांना दीदींकडे लक्ष ठेवण्याचे देखील सांगितले आहे.

तत्पूर्वी सुलोचनादीदी या ९४ वर्षांच्या असून, त्यांना श्वसनासंबंधी संसर्ग झाल्यामुळे दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीदी आजारी असल्याचे समजताच त्यांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. सोबतच दीदी यांच्या परिवाराशी देखील चर्चा केली आहे. दीदी उपचार घेत असलेल्या रुग्णालयाला तीन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

दरम्यान सुलोचना दीदींनी त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने केले. आई कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण त्या ठरल्या. प्रेमळ, कष्टाळू, कणखर, खंबीर आदी अनेक आईचे पैलू त्यांनी त्यांच्या भूमिकेतुन पडद्यावर लीलया उतरवले. लवकर दीदी बऱ्या होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– सिद्धार्थला पूर्णतः विसरलीये शहनाझ गील; होळीच्या रंगात रंगली आणि अशी काय नाचली, तुम्हीच पाहा हा व्हिडिओ
– मसाबा गुप्ताने वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांना वाढदिवसानिमित दिल्या खास शुभेच्छा; म्हणाली पप्पा ‘तुम्ही चांगलं केलं…’

हे देखील वाचा