Monday, February 24, 2025
Home साऊथ सिनेमा हिंमतीची दादच द्यायला पाहिजे! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याने तीन लग्न मोडल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा बांधली लगीनगाठ

हिंमतीची दादच द्यायला पाहिजे! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याने तीन लग्न मोडल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा बांधली लगीनगाठ

दाक्षिणात्य अभिनेते विजया कृष्ण नरेश यांनी पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. त्यांचे हे चौथे लग्न असून सध्या त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विजया कृष्ण नरेश यांनी त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. नरेश यांनी अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्न केले असून पवित्राचे देखील हे तिसरे लग्न आहे. दोघांचे हे लग्न तुफान गाजले सोबतच लग्नाच्या आधी मोठे भांडण देखील पाहायला मिळाले. नरेश यांची तिसरी पत्नी असलेल्या राम्या रघुपतिसोबत त्यांच्या घटस्फोट होणे बाकी होते. त्यामुळे कौटुंबिक ड्रामा, भांडणं आणि वाद खूप झाले.

नरेश आणि पवित्रा यांनी त्यांच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमच्या या नवीन प्रवासात आयुष्यभर शांती आणि आनंदासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे.” यासोबतच त्यांनी तेलगू भाषेत एक नोट लिहिली आहे.

नरेश हे दिवंगत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजया निर्मला यांचे चिरंजीव आहेत. त्यांना मागील तीन लग्नांमध्ये तीन मुलं देखील आहेत. त्यांनी पहिले लग्न जेष्ठ नृत्य गुरु श्रीनु यांच्या मुलीशी केले होते. त्यांना नवीन विजय कृष्ण नावाचा एक मुलगा आहे. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. पुढे त्यांनी प्रसिद्ध तेलगू कवि आणि गीतकार देवुलापल्ली कृष्ण शास्त्री यांच्या नातीशी रेखा सुपिर्या यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना एक ‘तेजा’ नावाचा एक मुलगा आहे. मात्र त्यांचा देखील घटस्फोट झाला. पुढे त्यांनी तिसरे लग्न राम्या रघुपति यांच्याशी केले. त्या त्यांच्यापेक्षा २० वर्ष लहान असून, केजीएफ सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि एपी राजनेता रघुवीरा रेड्डी यांच्या भाची आहेत. त्यांना देखील नरेश नावाचा मुलगा आहे. आता त्यांनी पवित्रा लोकेश यांच्याशी चौथे लग्न केले आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.

पवित्रा लोकेश यांचे देखील हे तिसरे लग्न आहे. त्यांनी पहिले लग्न सॉफ्टवेयर इंजिनियरसोबत केले तर दुसरे लग्न कन्नड कलाकार सुचेन्द्र प्रसादसोबत केले त्यांना दोन मुलं आहेत. पुढे त्यांनी घटस्फोट घेतला आणि त्या २०२१ पासून नरेश यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होत्या. आता त्यांनी लग्न केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण 

हे देखील वाचा