बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. यापूर्वी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. त्याच वेळी, आता राखी सावंतने तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ ‘झूठा’ रिलीज केला आहे आणि हे गाणे तिच्या वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित असल्याचे सांगितले आहे. एका चाहत्याने तिला कार भेट देऊन प्रभावित केले आणि नंतर तिच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर तिची फसवणूक केली हे गाण्यात दाखवण्यात आले आहे. गाणे लाँच झाल्यानंतर तिला ट्रोल केले जात असल्यामुळे राखीचे अश्रु अनावर झाले.
पॅपराझींशी बोलत असताना राखी (rakhi sawant) रडते आणि म्हणते की, “लोक म्हणतात राखी सावंतला कोण फसवू शकते, राखीचे काय होऊ शकते. मी माणूस नाही का, मी स्त्री नाही का, मला हृदय नाही का, मी सेटल होण्याची स्वप्ने पाहू शकत नाही का?” ती अचानक सगळ्यांसमोर जोरात ओरडली आणि ढसाढस रडत बसली.
View this post on Instagram
राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, “प्रिय राखी, प्रत्येकाला दाखवायची गरज नाही. कारण, पब्लिक बरोबर नाही, स्ट्रॅांग राहा, प्रत्येकाकडे तुझ्यासारखे हृदय असू शकत नाही.” त्यांना तुमची चेष्टा करण्याची संधी देऊ नका.
View this post on Instagram
राखीने तिच्या इंस्टाग्रामवर गाण्याचे पाेस्टर शेअर केले आहे. व्हिडिओमध्ये कशाप्रकारे काही आठवड्यात राखीचे आयुष्य बदलते हे दाखवण्यात आले आहे. हे गाणे अल्तमश फरीदी यांनी गायले असून संगीत आसिफ फरीदी यांनी दिले आहे. ( bollywood actress rakhi sawant life inspire song jhootha release actress cried in front of paparazzi said im also a human being )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कपिल शर्मा शोमध्ये पंतप्रधान मोदी येणार पाहुणे? कॉमेडियनने विचारले असता पंतप्रधानांनी दिले ‘हे’ उत्तर
आजारातून उठल्यानंतर ‘सुश्मिता सेन’ हिने केले असे काही कृत्य की, प्रेक्षकही झाले थक्क; एकदा बातमी वाचाच










