Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोरंजन विश्वात त्यांच्या दमदार अभिनयाने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली  आहे. अभिनयाबरोबरच त्यांना सामजिक कामांसाठी देखील ओळखले जाते. याच निमित्ताने ते तासवडे येथे गेले असता त्यांच्यासोबत एक घटना घडली. 

सयाजी शिंदे आपल्या चित्रपटांसोबतच त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड आहे. कामा व्यतिरिक्त पूर्णवेळ समाजसेवेत असतात. ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी समस्या आणि जंगल संवर्धनासाठी ते काम करत असतात. वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे उपक्रम चालू आहेत. पण याच कामा दरम्यान त्यांना एक दुखापत झाली.

पुणे बंगळुरु महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. झाडे वाचवण्यासाठी ते स्वतः तासवडे येथे स्वतः उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. अभिनेते सयाजी शिंदेनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘मधमाश्यांनी माझ्यावर हल्ला केला. परंतु काळजीचं काही कारण नाही, मला दोन-तीन माश्या चावल्या आहेत. कानाभोवती थोडी सूज आली आहे. मात्र आम्ही आता सुखरूप आहोत. चिंतेचं कारण नाही’. (actor-sayaji-shinde-attacked-by-bees)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

हे देखील वाचा