सध्या मनोरंजनविश्वात लग्नाचा बहार आला आहे. बॉलिवूडसोबतच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार सध्या लग्नाच्या बेडीत अडकत आहे. यातच आता ‘ये है मोहब्बतें’ मालिकेत भूमिका साकारून नावारूपाला आलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जी देखील लग्नबंधनात अडकली आहे. कृष्णाने तिचा बॉयफ्रेंड असणाऱ्या चिराग बाटलीवालासोबत लगीनगाठ बांधली आहे. या दोघांनी गोव्यामध्ये बंगाली पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर कृष्णा मुखर्जीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मागील बऱ्याच काळापासून कृष्णा मुखर्जी तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे लाइमलाईट्मधे होती. तिच्या लग्नाची तिच्या फॅन्सला खूपच उत्सुकता होतो. १३ मार्च २०२३ रोजी कृष्णाने तिचा बॉयफ्रेंड असणाऱ्या चिराग बाटलीवालासोबत गोव्यात समुद्र किनारी लग्न केले. बंगाली पद्धतीने लग्न असल्यामुळे नाव जोडपे लाल आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आले. कृष्णने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीसोबत डोक्यावर पांढऱ्या रंगाचा बंगाली पद्धतीचा मुकुट घातला होता. तर चिरागने देखील टोपोर घातला होता. दोघेही त्यांच्या लूकमध्ये कमालीचे आकर्षक आणि सुंदर दिसत होते. कृष्णने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून, हे पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये, “…आणि एक बंगाली मुलीने पारसीमुलासोबत आयुष्यभराचे नाते जोडले. आम्हला आमच्या या खास दिवशी तुम्ही सर्वानी तुमचा आशीर्वाद द्या.” तिच्या या फोटोवर सेलिब्रिटींसोबतच फॅन्सने देखील प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
कृष्णा आणि चिराग यांच्या लग्नाला जस्मिन भसिन, अली गोनी, शिरीन मिर्जा, चारू मेहरा, अर्जित तनेजा, करण पटेल आदी अनेक कलाकार उपस्थित होते. त्या सर्वानी देखील त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागच्या वर्षी कृष्णा आणि चिराग यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाची सर्वच वाट पहात होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’
जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार