Wednesday, December 3, 2025
Home मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी तब्बल 300 हून अधिक सिनेमात केलं होतं काम, हे आहेत त्यांचे गाजलेले सिनेमे

अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी तब्बल 300 हून अधिक सिनेमात केलं होतं काम, हे आहेत त्यांचे गाजलेले सिनेमे

मराठी चित्रपटांमधील दिग्गज आणि जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आपली प्रत्येक भूमिका त्यांनी उत्तमपणे निभावली. मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक दशकं त्यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली. चित्रपटांमध्ये नेहमीचे सहायक भूमिकेत दिसूनही भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांचे ओळख निर्माण केली. 

भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या अभिनयामुळे भूमिका लहान असली किंवा मोठी असली ती प्रभावी पद्धतीने साकारली. पेशाने शिक्षक असूनही त्यांनी अभिनयातही त्यांचा ठसा उमटवला. भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. पाटील, पोलीस अधिकारी, सरपंचपासून ते वडील, सासरे आदी सर्वच भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने साकारल्या. ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

भालचंद्र कुलकर्णी यांनी केलेल्या चित्रपटांमध्ये माहेरची साडी, शुभ बोल नाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, पिंजरा, मर्दानी, मासूम, मुंबईचा जावई, सोंगाड्या, खतरनाक, असला नवरा नको गं बाई, थरथराट, धुमधडाका, येऊ का घरात, पळवा पळवी, बाल शिवाजी, भक्त पुंडलिक, बिनकामाचा नवरा, सुशीला, एकटा जीव सदाशिव, अफलातून, ज्योतिबाचा नवस, माल मसाला, भुजंग, पुत्रवती, माहेरची माया, तुमचं आमचं जमलं, सामना अशा तब्बल ३०० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. शिवाय ज्या हिंदी चित्रपटांचे कोल्हापुरात चित्रीकरण व्हायचे अशा हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. रा. छत्रपती शाहू मालिकेसह अनेक टीव्ही अनेक मालिकेत आणि नाटकांमध्ये देखल त्यांनी उत्तम काम केले.

भालचंद्र कुलकर्णी यांना महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच चित्र भूषण पुरस्कारही देण्यात आला होता. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने,‘ब्रँड कोल्हापूरच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा