मागील अनेक दिवसांपासून सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई हे तुफान गाजत आहे. गँगस्टर लॉरेन्सच्या एका मुलाखतीमध्ये सलमान खानबद्दल केलेल्या खुलाशानंतर सतत ते चर्चेत आहे. बिश्नोई लोकांच्या हिटलिस्टमध्ये सलमान खानचे नाव असल्यामुळे आणि त्याला मारणार असल्याच्या माहितीमुळे सलमान खान आणि त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र आता या चिंतेत अधिक भर टाकणारी बातमी नुकतीच समोर आली आहे.
सलमान खानला एक धमकीचा इमेल मिळाला आहे. १८ मार्चला आलेल्या या इमेलमध्ये त्याला गोल्डी बरारसोबत चर्चा करायची आहे. याबद्दल सलमान खानचे मॅनेजर असलेल्या प्रशांत गुंजाळकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील याबाबत चौकशी सुरु करत सलमान खान आणि त्याच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.
मोहित गर्गच्या इमेल आयडीवरून सलमान खानच्या ऑफिसमध्ये हा इमेल आला असून, त्यात म्हटले आहे की, “तुझा बॉस असणाऱ्या सलमान खानसोबत गोल्डी भाईला (गोल्डी बरार)ला बोलायचे आहे. लॉरेन्स बिश्नोईंची मुलाखत तर पाहिलीच असेल. पाहिली नसेल तर सांगा पाहून घ्यायला. मॅटर बंद करायचे असेल तर बोलणे आवश्यक आहे. समोरासमोर बोलायचे आहे सांगून द्या. आता वेळ आहे तोपर्यंत सांगितले आहे. पुढच्या वेळेस थेट धक्काच मिळेल.” असे या धमकीच्या इमेलमध्ये म्हटले गेले आहे.
काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोईंने एका मोठ्या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, “काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला माफी माफी मागावीच लागेल. बिकानेरच्या त्या लोकांच्या मंदिरात येऊन त्याने माफी मागावी. मी आता गुंड नाही, मात्र त्याला मारून नक्कीच गुंड होईल. सलमान खानला मारणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे.” सुरक्षा निघाली की लगेच त्याला मारणार असे देखील तो म्हणाला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ
कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू










