Wednesday, January 28, 2026
Home बॉलीवूड ‘या’ चित्रपटातून दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल करतोय चित्रपटसृष्टीत पदार्पण!

‘या’ चित्रपटातून दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा मुलगा बाबिल करतोय चित्रपटसृष्टीत पदार्पण!

इरफान खानचा मुलगा बाबिल आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीसाठी सज्ज झाला आहे. वृत्त असे आहे की, अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाऊस क्लीनस्लेट फिल्म्स ‘काला’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला लाँच करणार आहे. बाबिलद्वारे या चित्रपटाचा टीझरही जारी करण्यात आला आहे. या आगामी चित्रपटात बाबिलसोबत तृप्ती डिमरी दिसणार असून, स्वस्तिक मुखर्जीही यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. बाबिलने शेअर केलेल्या टीझरवरून अंदाज लावला जाऊ शकतो की, या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये होत आहे.

बाबिलने ‘काला’ चित्रपटाचा टीझर शेअर करत लिहिले, “तृप्ती फ्रीकिंग डिमरी पुन्हा परत आली आहे. तसेच ‘लॉन्चिंग’ या वाक्यांशाबद्दल मी थोडासा संभ्रमित आहे, कारण आमचा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी त्यांच्या आसनावरुन उभे राहिले पाहिजे, हे कोणत्याही अभिनेत्याबद्दल नाही. बुलबुल, क्लीनस्लेट फिल्म्स आणि अन्विता दत्त यांच्या वतीने आम्ही तुमच्यासाठी ‘काला’ हा नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपट घेऊन येत आहोत. ‘काला’ लवकरच तिच्या आईच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी लढातानाची कहाणी घेऊन येत आहे.”

बाबिलच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह सेलेब्सही भरभरून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ‘काला’ चित्रपटाचे दिग्दर्शन अन्विता दत्त करत आहेत. क्लीनस्लेट फिल्म्सचा या अगोदरचा चित्रपट ‘बुलबुल’ याचेही दिग्दर्शन तिनेच केले होते. बाबिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या पोस्टद्वारे बऱ्याच वेळा चर्चेत राहतो. अनेकदा बाबिलला वडिलांची आठवण काढून भावुक होताना पाहिले जाते. त्याचे वडिल इरफान खान यांचे निधन मागच्या वर्षी कर्करोगामुळे झाले होते. या उत्तम अभिनेत्याच्या जाण्यामुळे अवघ्या बॉलिवूडला हादरा बसला होता.

हे देखील वाचा