बॉलीवूड पासून हॉलीवुडपर्यंत आपले नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिचा दमदार अभिनय आणि बोल्डनेस यामुळे ती सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. प्रत्येक चित्रपटातून तिचा वेगळाच अंदाज आणि वेगळीच स्टाइल प्रेक्षकांसमोर येत असते. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता नुकताच तिने तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.हा फोटो सर्वत्र मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तुम्ही सगळेजण हा विचार करत असाल की, लग्नानंतर प्रियांका चोप्राने तर अजून कोणती गुड न्यूज दिली नाही मग तिची मुलगी कशी काय??
ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल की, प्रियांका चोप्राला पाळीव प्राण्यांविषयी खूप आत्मीयता आहे. ती तिच्या घरातील डायना, गिनो आणि पांडा या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करते. तिने ही गोष्ट अनेक वेळा सांगितले आहे की, ती तिच्या प्राण्यांची एक आदर्श आई आहे. ती या प्राण्यांचे पालन-पोषण करते. प्रियांका सध्या तिच्या अनेक प्रोजेक्टच्या कामांमध्ये बिझी आहे. थोडासा वेळ मिळतो तेव्हा ती सगळा वेळ तिच्या प्राण्यांसोबत घालवते. ती लहान मुलांसारखे त्यांना सांभाळत असते. ती त्यांना खाऊपिऊ घालते. नुकताच प्रियांका चोप्राने तिची मुलगी डायना सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
प्रियांका चोप्राने डायना सोबतचा हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून असे लिहिले आहे की, “गर्ल टाईम.” प्रियांका चोप्रा डायनावर खूप प्रेम करते,आणि तिची खूप काळजी देखील घेत असते. त्यामुळे ती जिथे कुठे जाईल तिथे डायनाला तिच्या सोबत घेऊन जात असते. एवढंच काय प्रियांकाने डायनाच्या नावाने इंस्टाग्रामवर एक अकाउंट ओपन केले आहे. तिने तिचे आणि डायनाचे अनेक फोटो शेअर केले आहे. या अकाउंटला अनेक कलाकारांनी फॉलो केले आहे.
प्रियंका चोप्राने 10 आणि 11 एप्रिलला झालेल्या ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्डला उपस्थितती लावली होती. या कार्यक्रमात तिच्यासोबत अनेक हॉलीवूड कलाकार देखील होते. यामध्ये प्रियांका चोप्राचा “द व्हाईट टायगर” या चित्रपटाला देखील नॉमिनेशन मिळाले होते.