Thursday, April 24, 2025
Home मराठी ‘ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी’ म्हणत अभिनेत्री शिवाली परबने केली ‘फुलराणी’साठी खास पोस्ट

‘ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी’ म्हणत अभिनेत्री शिवाली परबने केली ‘फुलराणी’साठी खास पोस्ट

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने अमाप लोकप्रियता मिळवत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नवीन आणि हटके विनोद हे या शोचे मुख्य आकर्षण आहे. या शोच्या माध्यमातून मराठी विनोदी विश्वाला अनेक कलाकार मिळाले. याच शोमध्ये दिसणारी शिवाली परब या शोमुळे खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली आहे. एक विनोदी अभिनेत्री म्हणून तिची गिनती होते. याच शोच्या माध्यमातून अजून एक अभिनेत्री नावारूपास आली आणि ती म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. लवकरच प्रियदर्शिनी सुबोध भावासोबत ‘ती फुलराणी’ सिनेमात झळकणार आहे. याच निमित्ताने शिवालीने आपल्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये शिवालीने एक रील व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियदर्शिनी तिच्या ‘ती फुलराणी’मधील प्रसिद्ध संवाद म्हणताना दिसत आहे. यासोबत तिने लिहिले, “फॉर बीवाली. कुठून सुरवात करू समजत नाही आहे … चार वर्ष एकत्र काम करतोय, खूप जवळुन प्रवास पाहिला आहे तुझा, ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी करावी वाटतेय, खूप कौतुक खूप प्रेम खूप शुभेच्छा, ही तर फक्त सुरुवात आहे. कोलीवाड्याची थ्री टाईम ब्युटीक्वीन ‘फुलराणी’ येतेय फक्त ३ दिवसात, २२ मार्चपासून जवळच्या चित्रपटगृहात!!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

शिवालीने तिच्या या पोस्टमधून प्रियदर्शिनीच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन करताना तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. शिवाली आणि प्रियदर्शिनी यांची हास्यजत्रेतील जोडी चांगलीच गाजते. शिवालीच्या या पोस्टवर प्रियदर्शिनीने कमेंट करत तिचे आभार व्यक्त केले आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले, “प्रिय शिवाली, इतक्या उत्साहाने माझ्याकडून रिल करुन घेतलीस! तिथेच प्रेम कळतंय तुझं! प्रचंड थँक्यू! तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी नकळत शिकतेय! असंच एकमेकींकडून शिकत राहू! आय लव्ह यू!”. प्रियदर्शिनीसोबतच अनेक कलाकार आणि नेटकाऱ्यानी देखील या दोघींच्या मैत्रीचे कौतुक केले आहे.

सध्या शिवालीची ही पोस्ट आणि त्याचा रील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान ‘ती फुलराणी’ सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुभव सिन्हा यांच्या सांगण्यावरून आशुतोष राणा यांनी रागाच्या भरात राजकुमाराला लगावली होती चापट

‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा

हे देखील वाचा