बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने जेवढे नाव बॉलिवूडमध्ये कमावले, तेवढेच नाव ती आता हॉलिवूडमध्येही कमावताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियंका चोप्राचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्रियंका चोप्राच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती तिला ‘मस्तानी’ची भूमिका न करण्यामागील कारण विचारत आहे. प्रियांकाने या प्रश्नाला ‘परिपूर्ण’ उत्तर दिले आहे.
बॉलिवूडनंतर प्रियंका चोप्रा यांनी ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात ‘काशीबाईची भूमिका साकारली होती. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साली यांचा ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटात दीपिका पादुकोण ही मस्तानिच्या भूमिकेत दिसली होती. नुकताच या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका युझरने तिला ‘मस्तानी’ची भूमिका न करण्यामागील कारण विचारले.
सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ अचानक चर्चेत आला आहे. व्हिडिओ काही वर्षांपूर्वी आयोजित केलेल्या अवॉर्ड शो दरम्यानचा आहे. हा व्हिडिओ प्रियंका चोप्राचा आहे, ज्यामध्ये एका युझरने तिला विचारले होते की, ‘तुम्ही जेव्हा बाजीराव मस्तानीची स्क्रिप्ट ऐकत होता, तेव्हा तुम्ही दिग्दर्शकाला आग्रह का नाही केला की दीपिकाचा रोल मला द्या म्हणून?
Priyanka being asked if she’d ever insisted on doing Deepika’s role in BM ???????????????? what a perfect response lol from BollyBlindsNGossip
प्रियांकाने या युझरच्या या प्रश्नाला ‘परिपूर्ण’ उत्तर दिले. ‘बाजीराव मस्तानी’ मधील काशिबाईच्या भूमिकेसाठी मला अनेक पुष्पगुच्छ मिळाले आहेत, आता माझे घर एका ‘बागेसारखे’ दिसत आहे. हसत हसत ती म्हणाली, ‘तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? मला जर ही भूमिका आवडली नसती, तर ती मी केली असती का? काशीबाईंची भूमिका आवडली नाही का? या भूमिकेमुळे माझ्या घराची एक बाग झाली आहे.
प्रियंका चोप्राने ट्विटमध्ये म्हटले होते की, त्यावेळी काशिबाई ही तिची सर्वात कठीण व्यक्तिरेखा होती. तिने लिहिले की, “मी जोपर्यंत झोपायला बेडवर जात नसे, तोपयर्यंत मी किती थकले आहे याची जाणीव होत नसे.. काशी हे माझ्या सर्वात कठीण पात्रांपैकी एक आहे.”
‘बाजीराव मस्तानी’ मध्ये रणवीर सिंग हा पेशवा’ बाजीराव ‘या भूमिकेत होता, ज्यात प्रियंकाने त्यांची पत्नी’ काशिबाई ‘ची भूमिका साकारली होती. दीपिकाने त्याची दुसरी पत्नी आणि योद्धा राजकुमारी ‘मस्तानी’ हे पात्र साकारले होते.