Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अभिषेक माझा गौरव’ अभिषेक बच्चनला ‘तो’ पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केले लेकाचे कौतुक

अभिषेक बच्चन बॉलिवूडमधील मोठे नाव एक अभिनेता म्हणून प्रतिभावान असूनही अभिषेकला त्याच्या ताकदीच्या भूमिका जास्त मिळाल्या नाही, आणि तो त्याच्या वडीलनेटके मोठे यश मिळवू शकला नाही. मात्र अभिषेकला फॅन फॉलोविंग देखील भरपूर आहे. तो अभिनयासोबतच क्रीडाविश्वात देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. नुकताच त्याचा भारतीय क्रीडा पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीत ट्रॉफी प्रदान करत सन्मान करण्यात आला आहे. या विजयाने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन हे देखील त्यांच्या मुलाला मिळालेल्या या सन्मानाने आनंदित झाले असून त्यांनी त्यांचं आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अभिषेक बच्चनचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो त्याची ट्रॉफी हातात घेऊन दिसत आहे. या फोटोंसोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “येस….अभिषेक माझा गौरव! फिल्मफेयर बेस्ट ऍक्टर – दसवी आणि तू मालक असणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स टीमने कबड्डी चॅम्पियनशिप जिंकली आहे. आता जेपीपी फुटबॉल आणि क्रिकेटच्या अन्य काही लीग टीमच्या विरोधात विराट कोहली फाउंडेशनने स्पोर्ट्स ओनर्स ट्रॉफी जिंकली आहे. 2022-2023 WHTCTW !!!” वडिलांच्या या पोस्टवर अभिषेकने कमेंट करत लिहिले, “धन्यवाद पा”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिषेक बच्चनने देखील या विजयचा आनंद व्यक्त करताना सोशल मीडियाचा आधार घेतला. त्याने त्याचा ट्रॉफी हातात घेतलेला फोटो पोस्ट केला. ज्यात त्याने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले, “जय पिंक पैंथर्स को क्लब ऑफ द ईयर ही नवीन ओळख मिळाल्याने मी आभारी आहे आणि विनम्र आहे. टीममधल्या प्रत्येक खेळाडूवर मला अभिमान आहे. हा पुरस्कार टीमची मेहनत आणि समर्पणाचे प्रतीक आहे.” त्याच्या या पोस्टवर सेलेब्रिटींसह नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत त्याचे अभिनंदन केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा