मिका सिंग याचे गाणे असे असते, की लोक कायमच त्याच्या गाण्यावर ताल धरून नाचत असतात. त्याचे काही असे पण किस्से आहेत, ज्यामुळे तो कायम चर्चेत असतो. त्याच्या या किस्स्यांमुळे त्याचे चाहते कायमच विचारात पडतात. त्याने सगळ्यांसमोर टीव्हीवर मुझसे शादी करोगी हे गाणं म्हणत केलं प्रपोझ. मिका सिंग गाणं गाता गाता भूमी सिंगला स्टेजवर घेऊन आला, आणि सतत तो आपल्या गाण्यातून तिला विचारात राहिला की माझ्याशी लग्न करशील का? हे सगळं बघून प्रेक्षांसमवेत भूमीला पण खूप धक्का बसला.
भूमीने मीकाच्या या प्रपोजल वर सांगितल की मी आता मिकाबद्दल काय सांगू, खरें सांगायचे झाले तर, मी तुमच्यासाठीच मुलगी शोधायला आले आहे, तर हा दुसऱ्या मुलीवर मोठा अन्याय होईल. या दोघांचेही संभाषण अगदी मजेशीर वाटत आहे. मिका सिंग याच्याकडे बघून काही सांगू नाही शकत, कारण या आधीसुद्धा मिकाचे गुपित नाते होते, ज्यावरून चर्चा तर खूप झाली, पण त्या चर्चेचा काही फायदा झालेला बघताना दिसला नाही.
या आधी मिका सिंगचा एक फोटो व्हायरल झाला आहे की, तो टीव्ही अभिनेत्री अकांक्षा पुरी हिच्यासोबत लग्न करणार आहे,पण ही बातमी खोटी निघाली.आता खर्या अर्थाने भूमी त्रिवेदी सोबत त्याचा नातं असेल, कि नाही? का हा फक्त लोकप्रियतेसाठी केलेला व्हिडीओ आहे हे लवकरच चाहत्यांना समजेल.










