बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत तिच्या विवादित वक्तव्यांमुळेच चर्चेत असते. स्वरा आणि वाद ह्या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. मध्यंतरी स्वरा तिच्या लग्नामुळे चांगलीच प्रकाशझोतात आली होती. तिने सपाचे नेते असलेल्या फहद अहमदसोबत लग्न केले असल्याचे जाहीर केले आणि एकच गोंधळ झाला. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले. लग्नानंतर सर्व काही शांत असताना पुन्हा स्वरा अचानक सक्रिय झाली आणि तिने एक विवादित ट्विट केले आहे.
स्वराने तिच्या ट्विटमध्ये भारताबद्दल असे काही म्हटले आहे, जे अवचून लोकांचा राग अनावर झाला आणि तिला ट्रोल करण्यासोबतच अनेकांनी तिला विविध सल्ले देखील दिले. स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फुलांचे सुंदर फोटो शेअर केले. हे फोटो जरी सुंदर असले तरी यासोबत जे तिने लिहिले, त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. तिने जे लिहिले त्यावरून असे लक्षात येते कि तिच्यास्तही भारतात राहणे नक्कीच निराशाजनक आहे.
I’ve said this before.. to have a conscience and be living in #India today means to exist in a perennial state of despairing rage. ????
Here look at some flowers.. pic.twitter.com/97BwdgWgJf— Swara Bhasker (@ReallySwara) April 3, 2023
स्वरा भास्करने हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “यापूर्वी देखील मी हे सांगितले आहे की, विवेकबुद्धी असणे आणि आज भारतात राहणे म्हणजे रोजच निराशेच्या, रागाच्या स्थितीत जगणे. या फुलांना बघा…” यासोबतच स्वरानेही या पोस्टसोबत एक तुटलेले हृदय असलेला ईमोजी देखील पोस्ट केला आहे.
स्वराच्या या ट्विटनंतर आता तिला लोकांनी जोरदार ट्रोल करत विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “तू सीरिया, इराण, इराक, येमेन किंवा पाकिस्तानचे तिकीट बुक करू शकते…” दुसऱ्याने लिहिले, “मग जा पाकिस्तानला.” अजून एकाने लिहिले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात आनंदी आणि सुरक्षित आहे. तू तुझी मानसिकता बदलायला हवी.”
हे पहिल्यांदाच आहे असे नाही याआधी देखील स्वरा भास्करने अनेकदा देशाबद्दल ट्विट केले आणि तिला जोरदार ट्रोल केले गेले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल
पहिल्याच भेटीत पल्लवीने विवेकला समजले होते गर्विष्ठ, मात्र पुढे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींमध्ये फुलली प्रेमकथा