बॉलीवूड मधील दिलदार अभिनेता म्हणजे सोनू सूद. कोरोना काळात त्याने केवळ गरीब माणसांची मदतच नाही केली, तर हजारो जनतेसाठी तो एक प्रेरणा स्त्रोत म्हणून त्यांना प्रेरणा देताना दिसत होता, त्याच्या चित्रपटा व्यतिरिक्त एक माणूस म्हणून देखील अनेकांना मदत केली आहे. यासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे. अभिनयात तर तो सगळ्यांचा बाप आहे, परंतु त्याच्या खऱ्या आयुष्यात देखील तो सगळ्यांचा एक सुपरहिरो बनला आहे. वेगवेगळया कामांमुळे तो नेहमीच सगळ्यांमध्ये चर्चेत असतो. आता देखील सोनू सूदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी काहीतरी करत आहे. या व्हिडिओमध्ये सोनू सूद त्याच्यासाठी डोसा बनवताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनू सूद चित्रपटाच्या सेटवर डोसा बनवताना दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि कुरकुरीत डोसे कसे बनवायचे याच्या टिप्स त्याच्या चाहत्यांना देताना दिसत आहे. कुकिंगमधील त्याचे हे लपलेले टॅलेंट आज सगळेजण बघत आहेत. आणि त्याच्या या टॅलेंटला भरभरून दाद देताना दिसत आहेत . त्याच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा आहे, आणि सगळेजण त्याचे खूप कौतुक करत आहेत.
सोनू सुदचा हा व्हिडिओ पाहून फरा खानने त्याचे खूप कौतुक केले आहे. तसेच त्याचे हे टॅलेंट बघून त्याला घरी सुद्धा बोलावले आहे. त्याचा हा व्हिडिओ बघून फरा खानने त्याला कमेंट केली आहे की, “मग घरी येऊन जा एकदा.” सोनू सुद अत्यंत मजेशीर अंदाजात यावर उत्तर दिले आहे की, “मला डोसा बनवण्यासाठी माझ्या सुट्टीच्या दिवशी देखील सेटवर बोलावले आहे.” सोनू सूदच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांकडून कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.










