Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलमान खानचा पुरस्कार सोहळ्यामध्ये वडिलांसमोरच झाला होता अपमान, त्याने असा घेतला होता बदला

सलमान खान हा बॉलिवूडमधला सर्वात दबंग स्टार आहे. त्याने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. सलमानचा सिनेमा येणार असला काय आणि नसला काय तो सतत विविध कारणांनी प्रकाशझोतात येतच असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे खूपच चर्चेत आला आहे. यातच आता तो एका पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन देखील करताना दिसणार आहे. याच पुरस्काराच्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान त्याने एक किस्सा सर्वांना सांगितला.

सलमान खान बऱ्याच मोठ्या काळानंतर मीडियासमोर आला. यातच त्याने पुरस्कार सोहळ्यामागील काळे सत्य समोर आणले. त्याच्यासोबतच एक किस्सा झाला होता, तो त्याने यावेळेस सांगितला.

सलमान खानला त्याच्या ‘मैने प्यार किया’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात येणार असल्याचे फिल्मइयर ग्रुपच्या एडिटरने त्याला सांगितले. त्याला हे ऐकून खूपच आनंद झाला. ही गोष्ट त्याने घरी सांगितल्यावर घरचे देखील खूपच खुश झाले. त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सलमान खान त्याचे वडील सलीम खान आणि इतर कुटुंबीय एकदम छान रुबाबदारपणे तयार होऊन त्या सोहळ्यात आले. सर्व आनंदात होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे सलमान खान म्हणाला, “जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नॉमिनेश जाहीर केले गेले तेव्हा माझे नाव पहिले घेतले आणि मी ते ऐकून उभा राहिलो. त्यानंतर अजून एका अभिनेत्याचे नाव घेण्यात आले. त्यानंतर सरतेशेवटी जॅकी श्रॉफला हा पुरस्कार देण्यात आला. ते पाहून आम्ही सर्वच हैराण झालो. वडील म्हणाले, हे काय आहे?”

रागाच्या भरात सलमान खान स्टेजच्या मागे पोहचला आणि त्या एडिटरला म्हणाला, ” नक्कीच जॅकी श्रॉफने चांगले काम केले. मात्र तुम्ही माझ्यासोबत असे कार्याला नव्हते पाहिजे. तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र आहेत मला धोका नव्हता द्यायला पाहिजे..” त्या सोहळ्यात सलमान एक परफॉर्मन्स देखील देणार होता, मात्र त्याने नंतर तो करायला नकार दिला. एडिटरने त्याला परफॉर्म करण्यास सांगितले , मात्र तो तयार झाला नाही. शेवटी त्याला पैसे देण्याचे कबुल करण्यात आले. तेव्हा कोणीच अशा सोहळ्यांमध्ये परफॉर्मन्ससाठी पैसे द्यायचे नाही. हे ऐकून सलमानने मोठी रक्कम मागितली आणि त्यांना ती त्याला द्यावी लागली.

अखेर तो एडिटर सलमानला हेच बोला की ‘हे कोणाला सांगू नको’ यावर सलमान म्हणलं, “तुम्ही चुकीच्या माणसाला हे सांगत आहात.” बोलण्या बोलण्यात सलमान खानने पुरस्कार सोहळ्यांमागचे काळे सत्य लोकांसमोर आणले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली

हे देखील वाचा