भोजपुरी चित्रपट सृष्टीमधील देशी सुपरस्टार समर सिंग याचं कोणतंही गाणी प्रदर्शित होता क्षणीच सोशल मीडियावर व्हायरल होत असते. त्याच्या प्रत्येक गाण्याला त्याच्या प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत असते. असेच समर सिंगचे आणखी एक गाणे सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. समर सिंग याचे ‘छतवा पे पतोहिया नाचत बा’ हे गाणे यू ट्युबवर प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होता क्षणी या गाण्याने यू ट्युबवरील सगळे रेकॉर्ड तोडताना दिसत आहे.
केवळ 24 तासात या गाण्याला यूट्युबवर एक मिलियन पेक्षाही जास्त व्यूज मिळाले आहेत. तसेच हा आकडा वाढताना देखील दिसत आहे. समर सिंगने हे गाणे त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनल वरून प्रदर्शित केले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समर ऑफिसमध्ये आहे, आणि पत्नी टेरेसवर डान्स करत आहेत. हा डान्स बघण्यासाठी आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले आहे.
यूट्युबवर सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याला समर सिंग याने गायले आहे. अनोख्या पद्धतीने या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. गाण्यातील अनेक जागा आणि शूटिंगमुळे या गाण्याला यूट्युबवर सर्वत्र प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. समर सिंग याच्या या गाण्यात त्याच्यासोबत मनोज सिंग यादव हा देखील दिसत आहे.
गाण्याचे बोल ‘आलोक यादव’ यांनी लिहिले आहे. ‘ए .डी. आर. आनंद’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. त्याच्या गाण्यांमध्ये अनेक ज्युनियर कलाकार देखील दिसत आहे. त्यामुळे गाण्याला भरभरून लाईक्स मिळत आहेत. तसेच हे गाणे मोठ्या प्रमाणात शेअर देखील केले जात आहे.
व्हिडिओमध्ये पाहू शकता की, निळया रंगाच्या शर्टमध्ये समर खूपच छान दिसत आहे. तो त्याच्या ऑफिसमध्ये काम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्याच्या घराच्या छतावर त्याची पत्नी मोबाईलवर व्हिडिओ तयार करताना डान्स करत आहे. आपल्या सूनेला डान्स करताना पाहून त्याचे वडील खूप हैराण होतात, आणि ते त्याला फोन करून सांगतात की, ‘छतवा पे पतोहिया नाचत बा.’ अशाप्रकारे हे गाणे अत्यंत उत्तम पद्धतीने चित्रीकरण केले आहे. त्यामुळे सगळ्यांना हे गाणी खूपच भावले आहे. समर सिंग त्याच्या या गाण्याला भेटणाऱ्या भरभरून प्रतिसादाबद्दल आभार मानताना दिसत आहे.