गुजराती सिनेमा सध्या प्रगतीपथावर आहे. प्रतीक गांधीसारखे दिग्गज कलाकार ‘स्कॅम १९९२’ सारख्या धमाकेदार वेब सीरिजच्या माध्यमातून, आपल्या अप्रतिम कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. गुजराती सिनेमात बर्याच अभिनेत्री देखील आहेत, ज्या अतिशय सुंदर आणि अद्भुत अभिनयाने प्रेक्षकांचा मनावर राज्य करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ५ गुजराती अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या त्यांच्या अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
अलिशा प्रजापती-
अलिशा प्रजापती हे गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्रीने थिएटरपासून सुरुवात केली होती आणि नंतर तिने चित्रपटांत प्रवेश केला. तिने २०१७ मध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘टीचर ऑफ द इयर’, ‘अरमान स्टोरी ऑफ अ स्टोरीस्टेलर’ इत्यादी चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. फॅशन ट्रेंडच्या बाबतीत अभिनेत्री खूपच लोकप्रिय आहे.
ईशा कनसारा-
गुजराती अभिनेत्री ईशा कनसारा ही हिंदी टीव्ही मालिकांमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. ती कलर्सचा शो ‘मुक्तिबंधन’, सब टीव्ही शो ‘माय नेम इज लखन’ आणि ‘मॅडम सर’ मध्ये दिसली आहे. लवकरच तिचा ‘जिंदगी मेरे घर आना’ हा नवीन शोही स्टार प्लसवर सुरू होणार आहे. ईशाने साल २०१७ मध्ये ‘दुनियादारी’ नावाच्या गुजराती चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरवात केली होती.
व्योमा नंदी-
व्योमा नंदीने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात २०१६ साली आलेल्या तेलुगू चित्रपट ‘मरला तेलूपना प्रिया’पासून केली होती. तिने २०१७ मध्ये ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ या चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपटांमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेबद्दल तिला गुजराती आयकॉनिक फिल्म पुरस्कारानेही गौरविण्यात आले. व्योमाने खूप चित्रपटांत काम केलेले नाही, परंतु गुजराती चित्रपटातील तिच्या अभिनयावर प्रेक्षक फिदा आहेत.
नेत्री त्रिवेदी-
नेत्रीने ‘चेल्लो दिवस’, ‘अरमान’, ‘शु थयू’ या गुजराती चित्रपटांत काम केले आहे. या अभिनेत्रीने थिएटरमध्येही खूप नाव कमावले आहे. सोशल मीडियावर ती बरीच चर्चेत राहते. तर इंस्टाग्रामवर 2 लाखाहून अधिक युजर अभिनेत्रीला फॉलोव करतात.
डिंपल बिस्कीटवाला-
डिंपल हे गुजराती चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव बनले आहे. डिंपल अभिनेत्रीव्यतिरिक्त एक प्रतिभावान गायिकाही आहे. २०१५ मध्ये रिलीझ झालेल्या ‘लावरी’ या चित्रपटापासून तिला तिचा पहिला ब्रेक मिळाला होता.
याशिवाय तिने ‘तू छे’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










