Wednesday, April 30, 2025
Home भोजपूरी जान्हवी कपूरच्या डान्स स्टेप्स कॉपी करत मोनालिसाने लावले ‘नदियों पार’ गाण्यावर जोरदार ठुमके! पाहा व्हिडिओ

जान्हवी कपूरच्या डान्स स्टेप्स कॉपी करत मोनालिसाने लावले ‘नदियों पार’ गाण्यावर जोरदार ठुमके! पाहा व्हिडिओ

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. काही काळापूर्वीच तिला कोरोना व्हायरसने ग्रासले होते, परंतु अशा परिस्थितीतही ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत होती. टीव्ही मालिका ‘नमक इश्क का’ यामध्ये इरावतीची भूमिका साकारून, मोनालिसा तिचा चाहतावर्ग वाढवित आहे.

दरम्यान, तिचा लेटेस्ट डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या डान्स व्हिडीओमध्ये मोनालिसा जान्हवी कपूरच्या ‘नदियों पार’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेला तिचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे.

मोनालिसा भोजपुरी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वांची चहेती बनलीच आहे, पण आता ती तिच्या अभिनयासोबतच उत्कृष्ट डान्समुळेही प्रसिद्ध होत आहे. मोनालिसा अनेकदा चाहत्यांसाठी तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते आणि म्हणूनच तिला ‘इंटरनेट सेन्सेशन’ म्हटले जात आहे.

या डान्स व्हिडिओमध्ये मोनालिसा जान्हवी कपूरच्या ‘नदियों पार’ गाण्याच्या डान्स स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक डान्स पार्टनर देखील आहे, ती पण जबरदस्त डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मोनालिसा लवकरच ‘सरकार राज’, ‘मनी है तो हनी है’, ‘गंगा पुत्र’ आणि ‘काफिला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लवकरच हे चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील.

हे देखील वाचा