Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड पदार्पणातच फिल्मफेयरचा पुरस्कार जिंकणाऱ्या मिस युनिव्हर्स लारा दत्ताचे वैयक्तिक आयुष्य राहिले नेहमीच चर्चेत

पदार्पणातच फिल्मफेयरचा पुरस्कार जिंकणाऱ्या मिस युनिव्हर्स लारा दत्ताचे वैयक्तिक आयुष्य राहिले नेहमीच चर्चेत

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर केला आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता. लाराने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या हुशारीने हा ताज आपल्या नावावर करत इतिहास घडवला. लाराने आपला सहजसुंदर अभिनयाने आपल्या चाहत्यांना अगदी भारावून सोडले. एकापेक्षा एक असे अनेक चित्रपट तिने दिले. भूमिका कोणतीही असो तिने नेहमीच आपले सर्वोत्तम दिले आहे. ती 16 एप्रिल आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)


लाराचा जन्म उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे झाला होता. लारा हिंदी, पंजाबी, कन्नड, फ्रेंच या भाषेत तरबेज असून, लारा दत्ताचे वडील पंजाबी आणि आई एँग्लो इंडियन आहे. सन २००० मध्ये मिस युनिव्हर्सचे विजेतेपद पटकावत सर्वांना आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले होते. तिने केवळ देशाचे नाव मोठे केले नाही, तर बॉलिवूडमध्येही यशस्वी करिअर घडवले. ती आता चित्रपटांमध्ये कमी दिसत असली, तरीही तिने चित्रपट कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tina Dehal (@tinadehal)


लाराने सन २००३ मध्ये तिने ‘अंदाज’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पदार्पणचा पुरस्कार मिळाला होता. लाराने ‘मस्ती’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल’, ‘चलो दिल्ली’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिली आहेत. तिची मॉडेलिंग कारकीर्द चित्रपटांपेक्षा अधिक चांगली मानली जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)


चित्रपट कारकिर्दीसोबतच लारा तिच्या अफेअर्ससाठीही चर्चेत होती. तिचे नाव केली डोर्जी, डिनो मोरिया यांच्याशी जोडले गेले होते. पण लारा दत्ताचे मन कालांतराने टेनिसपटू महेश भूपती याच्याशी जुळू लागले. त्यावेळी महेश भूपती यांचा अजून घटस्फोट झालेला नव्हता. त्यानंतर त्याने त्याचे पहिले लग्न मोडत लारा दत्ताशी २०११ मध्ये लग्न केले. जेव्हा महेश आणि लारा भेटले होते, तेव्हा तिला महेशचा साधेपणा फार आवडला. दोघांनाही मुलगी सायरा असून, लारा अनेकदा आपल्या मुलीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta Bhupathi (@larabhupathi)

लग्नानंतर लारा हळूहळू चित्रपटांपासून दूर गेली. परंतु लारा आता ओटीटी प्लँटफॉर्मवर जास्त सक्रिय असून, तिने काही काळापूर्वी ‘हंड्रेड’, ‘हिकप्स अँड हुक्प्स’, ‘कौन बनेगी शिखरवती’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्या गरोदरपणात, लाराने अनेक योगा व्हिडिओ तयार केले होते, जे सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय झाले होते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची फोटोही चाहत्यांना आवडत असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘शांती’ मालिकेपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंदिराने क्रिकेट अँकरिंग करत मिळवली होती तुफान वाहवा

HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार

हे देखील वाचा