Saturday, May 23, 2026
Home अन्य पीएम मोदी यांची नक्कल करणे ‘या’ कॉमेडीयनला पडले चांगलेच भारी, वन विभागाने पाठवली नोटीस

पीएम मोदी यांची नक्कल करणे ‘या’ कॉमेडीयनला पडले चांगलेच भारी, वन विभागाने पाठवली नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणे प्रसिद्ध कॉमेडीयन असणाऱ्या श्याम रंगीलाल चांगलेच भारी पडले आहे. ही गोष्ट तर सर्वांनाच माहित आहे की, श्याम पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री किती सफाईने करतो ते. तो पंतप्रधानांचा आवाज देखील उत्तम काढतो. मात्र यावेळेस त्याला ही नक्कल करणे चांगलेच भारी पडले आहे. श्याम रंगीलाने नुकतेच जयपूरमधील जंगलांमध्ये जाऊन एका नीलगायला चार खाऊ घातला आणि त्याचा व्हिडिओ केला.

श्यामचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला राजस्थानच्या वन विभागाने नोटीस पाठवली आहे. सांगितले जात आहे की, वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर आता कारवाई होऊ शकते. श्याम रंगीलाला ही नोटीस क्षेत्रीय वन अधिकाऱ्यांनी पाठवली आहे.

दरम्यान नुकतेच टायगर प्रोजेक्टचे ५० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने पीएम मोदी यांनी कर्नाटकच्या मुदुमलाई आणि बांदीपूर टायगर रिजर्व इथे पोहचले होते. इथे मोदी टोपी, चष्मा घातलेल्या लूकमध्ये दिसले. त्यांचा हा लूक खूपच व्हायरल झाला आणि हिट झाला होता. पीएम मोदी यांच्या याच दौऱ्याला समोर ठेऊन त्याची ट्रिप प्लॅन केली.

श्याम रंगीलाने मोदी यांच्या सारखेच हातात दुर्बीण, चष्मा आणि टोपी घातली असून, या अवतारात तो नीलगायला जेवण देत असताना व्हिडिओ शूट केला आणि तो त्याच्या उटूएब चॅनेलवर पोस्ट केला. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा जीवांना खाद्य पदार्थ देणे त्यांच्या जीववर देखील बेतू शकते. सामान्य खाद्यपदार्थ प्राण्यांना देऊ नये असे लिहिले असूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा