टीव्ही अभिनेत्री संजिदा शेख इतर अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनते. ती तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. असाच तिचा एक नवीन फोटो सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये संजिदा बॉलिवूड अभिनेत्रीं पेक्षाही कितीतरी पटीने हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष फक्त आणि फक्त तिच्या फोटोकडे लागलेले आहे.
संजिदा शेखने लाल रंगाचा ड्रेस घालून एक बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तिच्या प्रेक्षकांसाठी शेअर केले आहे. या फोटोमध्ये तुम्ही बघाल तर ती खूपच बोल्ड दिसत आहे. त्यामुळे तिचे चाहते तर तिच्या सौंदर्याचे दिवाने झालेले दिसत आहेत. सगळेजण तिला प्रतिक्रिया देऊन तिच्या या ड्रेसचे आणि तिचे कौतुक करताना दिसत आहे.
तसेच या आधी देखील तिने पर्पल कलरचा टॉप घालून फोटोशूट केले होते. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोमध्ये तिच्या अदा बघून सगळेच चाहते घायाळ झाले होते. संजिदा ही टीव्ही अभिनेत्रींपैकी सगळ्यात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मानली जाते.
संजिदा ही ‘तॅश’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयाने तिने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षीत केले होते. या आधी संजिदाने ‘कयामत’ आणि ‘इश्क दा रंग सफेद’ या टीव्ही मालिकांमधून घराघरात सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे आज सगळ्यांच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच छाप पडलेली आहे.
संजिदाने टीव्ही अभिनेता आमिर अलीसोबत 2012 मध्ये लग्न केले होते. ती त्यांच्या अनेक वादावरून चर्चेत होती. पण त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य कधीच मीडियासमोर येऊ दिले नाही. संजिदा शेख आणि आमिर अली यांना सरोगसी पासून एक मुलगी देखील आहे. जिचे नाव आयरा आहे. दोघेही त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करतात. त्यांच्या मुलीसोबत अनेक फोटो ते वारंवार सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.