Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड विनोद मेहरा आणि अभेनेत्री रेखा यांच्या नात्याचा झाला असा कटू शेवट

विनोद मेहरा आणि अभेनेत्री रेखा यांच्या नात्याचा झाला असा कटू शेवट

अभिनेते  विनोद मेहरा यांनी बालपणापासूनच आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात केली, आणि बघता बघता १०० चित्रपट त्यांच्या नावे झाले. ‘रागिणी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरवात केली. त्याच वेळी विनोद मेहरा यांनी आपल्या कारकीर्दीत, ‘अनुराग’, ‘आणि’ लाल पत्थर ‘सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

विनोद मेहरा यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, विनोद मेहरा यांचे ३ विवाह झाले होते. यांचे पहिले लग्न मीना ब्रोका यांच्याशी झाले होते, जे त्यांच्या आईच्या इच्छेनुसार केले होते. त्यानंतर यांना हृदयाचा झटका आला, त्यातून ते सावरत असताना नव्याने प्रेमात हरवले, ते बिंदिया यांच्या. खेदाची गोष्ट म्हणजे हे लग्न टिकले नाही, आणि लग्नाच्या काही काळानंतर बिंदीया यांनी विनोद यांना सोडले. त्याचवेळी रेखा विनोद यांच्या आयुष्यात आल्या. मीडिया रिपोर्टनुसार रेखा आणि विनोद यांचे गुपचूप लग्न झाले. लग्नानंतर विनोद यांनी रेखा यांची ओळख आपल्या आईसोबत करून दिली पण, आईंना रेखा आवडल्या नाही.

रेखा यांना पाहून विनोद यांच्या आईने अक्षरशः चप्पल देखील उचललली होती आणि त्यामुळे साहजिकच रेखा मनाने दुखावल्या गेल्या. नंतर विनोद यांचे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, आणि दोघांची प्रेमकथा अल्पावधीतच संपली.

हे देखील वाचा