अजय देवगण आणि काजोलची लेक न्यासा देवगण 20 एप्रिलला तिचा 20 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त अजय आणि काजोलने आपल्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अजयने न्यासाला आपला अभिमान असे वर्णन केले आहे, तर काजोलने तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
काजोलने तिची मुलगी न्यासासाेबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये माय अन् लेक यांच्यातील खास बंध दिसत आहे. हा फोटो नीता मुकेश अंबानीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील आहे, ज्यामध्ये न्यासा आणि काजोल ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये दिसत आहेत. ही पाेस्ट शेअर करत काजाेलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ही आमची आणि आमची कायमची कहाणी आहे. तुझा सेंस ऑफ ह्यूमर, माइंड आणि सुंदर हार्ट लव्ह यू बेबी गर्ल. तू आनंदी राहा व कायम माझ्यासोबत रहा.”
View this post on Instagram
अभिनेत्याला वाटताे लेकीचा अभिमान
अजय देवगणचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे हे सर्वांना माहीत आहे. खासकरून तो त्याची मुलगी न्यासाबाबत खूप प्रोटेक्टिव आहे. वाढदिवसाच्या या निमित्ताने सोशल मीडियावर न्यासासाेबतचा फोटो कोलाज शेअर करताना अजयने लिहिले, ‘वडीलांना तुझा अभिमान आहे. हॅप्पी बर्थडे बेबी. शेअर केलेल्या फोटोंमध्ये न्यासा आणि अजय दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत.
#FatherofMyPride
Happy birthday baby. pic.twitter.com/4StMWGytiK— Ajay Devgn (@ajaydevgn) April 20, 2023
न्यासाने सिंगापूरमध्ये पुर्ण केले शालेय शिक्षण
काजोलने 1999 मध्ये अजय देवगणसोबत गुपचूप लग्न केले होते आणि 4 वर्षांनी 20 एप्रिल 2003 रोजी मुलगी न्यासाला जन्म दिला. त्याच वेळी, 2010 मध्ये, काजोल दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने मुलगा युगला जन्म दिला. न्यासाचे शालेय शिक्षण सिंगापूरमध्ये झाले आहे.( bollywood actor ajay and kajol wished their daughter on her birthday shared special pictures)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणितीने दिली अजब रिॲक्शन; पाहा व्हायरल व्हिडीओ
आकांशा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल म्हणाली, ‘मला काही झाल्यास त्याला जबाबदार…’










