Monday, August 4, 2025
Home मराठी ‘काल म्हणजे तू जे केल आहे ते म्हणजे…’ ‘या’ मराठी अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी लिहिली पोस्ट

‘काल म्हणजे तू जे केल आहे ते म्हणजे…’ ‘या’ मराठी अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी लिहिली पोस्ट

कलाकार होणे अजिबातच सोपी बाब नाही. खूप मोठी जबादारी आणि कामाप्रती समर्पण यासाठी लागते. दिवसातले तब्बल १६/१७ तास हे कलाकार शूटिंग करत असतात. त्यांच्या कामामुळे त्यांना कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. नेहमीच त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा व्यावसायिक आयुष्याला अधिक महत्व द्यावे लागते. अगदी आनंदाने ते हे करतात अशात त्यांचे कुटुंब देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत असते. याच संदर्भात एक पोस्ट मराठी अभिनेता ऋतुराज फडकेने केली आहे.

काही दिवसांपूर्वीच ऋतुराजचे लग्न झाले. मात्र कामामुळे त्याला बायकोला वेळच देता येत नाही. त्यांच्यात संवाद देखील खूप कमी होत आहे. अशातच ऋतुराजने आजच्या सोशल मीडियाच्या काळात बायकोला चक्क पत्र लिहिले आहे. त्याने सोशल मीडियावर प्रीतीला पत्र लिहीत त्याच्या भावना व्यक्त तर केल्या सोबतच तिची माफी देखील मागितली आहे. ऋतुराजने त्याच्या पत्रात लिहिले. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Phadke (@ruturajphadke)

पत्र लिहिण्यास कारण की..

प्रिय बायको..
गेले अनेक दिवस मी दोन मालिकांचे शूटींग करत असल्यामुळे भेट होत नाही, शूटींगचा सेट माझ्या घरापासून २.३० तास अंतरावर असल्यामुळे , माझे रोजचे १७ तास शूटींग आणि प्रवासात जातात, त्यामूळे गेले काही दिवस प्रत्यक्ष भेटुन एकमेकांनशी गप्पाच झाल्या नाहीत.. काल बाहेर ४१ डिग्री तापमान होत, आणि मी out door ला शूटींग करत होतो, फाईट सिक्वेन्स करत होतो, दिवसभर हे सुरू होत .ऊन प्रचंड असल्यामुळे प्रोडक्शने विशेष काळजी घेतली होती.( लिंबू पाणी, थंड पाणी, पंखे,) तरी त्रास होत होता.. ४१ डिग्री मध्ये जमिनीवर अनवाणी पायाने मला धावा धाव करायची होती. तळपत्या उन्हात पाय ठेवणं म्हणजे जळत्या कोळशावरती पाय ठेवल्या सारख वाटत होत, सकाळी ७ वाजेपासून सुरु झालं ते संध्याकाळी ५.३० वाजता संपलं, घरी आलो माझा थकलेला चेहरा बघुन आई नी डोक्याला तेल लाऊन दिलं, गरम गरम चहा दिला, खूप थकलो असल्यामुळे थोड्याच वेळ गप्पा मारून झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी शूटींग ला जायचं होत, मला झोप लागली, साधारण मध्य रात्री माझ्या पायाला कोणीतरी काही तरी करतय हे जाणवलं, मी जागा झालो तर, माझी बायको माझ्या तळपायाला “कैलास जीवन” लावत होती. कारण उन्हात पळून माझ्या पायाला बऱ्या पैकी दुखापत झाली होती, मी घरी सांगितलं नव्हतं, जे घरातल्या घरात मी चालत होतो, त्या वरून माझ्या बायकोला जाणीव झाली होती, की ह्याला त्रास होतोय, तिने ३ ते ४ वेळा विचारलं सुद्धा पायाला तेल किंव्हा क्रीम लाऊन देऊ का? मी म्हटल नको नंतर मी लावीन आणि हे बोलुन मी गाढ झोपून गेलो, तर मध्य रात्री तू माझ्या पायाला कैलास जीवन लावत होतीस, ह्या आणि अश्या बऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या साठी तू न सांगता करतेस, आपलं लग्न होण्याच्या आधी ४ वर्ष रिलेशन मध्ये होतो, तेव्हा सुद्धा अश्या बऱ्याच गोष्टी तू माझ्या साठी केल्या आहेस, काल म्हणजे तू जे केल आहे ते म्हणजे खरच.. माझ्या कडे शब्द नाही आहेत.. माझं खरच भाग्य आहे की, तुझ्या सारखी बायको, मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे, तू मला जो सपोर्ट करतेस, ज्या प्रकारे माझ्या मागे खंबीपणे उभी राहते आहेस, त्यामुळे मी इतका पळू शकतो आहे..तुला मला thank you म्हणायचं नाहीये कारण ते तुला आवडणार नाही.. पण सगळ्यांन समोर i love you नक्कीच म्हणीन..
(आपली माणसं आपल्यासाठी नकळत खूप काही करत असतात आपण परतफेड नाही करू शकत किमान आपण त्याच्या बद्दल दोन शब्द लिहू नक्कीच शकतो) ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Phadke (@ruturajphadke)

दरम्यान ऋतुराज हा मराठी टेलिव्हिजनविश्वातील ओळखीचा चेहरा आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत झळकला होता. आता तो ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत झळकत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी

हे देखील वाचा