Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘टायगर 3’च्या सेटवर स्मोकिंग करताना दिसला सलमान खान, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन भाईजानसाठी थोडे निराशाजनक होते. कारण, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ 13 कोटींची कमाई केली हाेती, परंतु शनिवारी चित्रपटाच्या व्यवसायात मोठी उडी पाहायला मिळाली आहे. ईदच्या मुहूर्तावर या चित्रपटाने 25 कोटींची कमाई केली आहे. अशातच भाईजानच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे, ज्यामध्ये भाईजान स्मोकिंग करताना दिसत आहे.

ईदच्या मुहूर्तावर, ‘टायगर 3’मधील हा लीक झालेला व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून चाहते दंग झाले आहेत. या क्लिपमध्ये सलमान काळ्या रंगाचा शर्ट घालून टीमसोबत बसलेला दिसत आहे. दरम्यान, तो बोलत असताना धूम्रपान करताना दिसत आहे. हे पाहिल्यानंतर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ‘भाईने एक गँगस्टर चित्रपट करावा,ज्यामध्ये तो सिगार ओढताना दिसला तर मजा येईल.’

यासाेबतच सलमान खानच्या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आणखी एका युजरने लिहिले की, ‘आता दिवाळीची वाट पाहू शकत नाही.’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, ‘ही सर्वात मोठी ओपनिंग असेल.’ अशाप्रकारे टायगरची ही व्हायरल क्लिप पाहून चाहते त्याच्या आगामी सिनेमासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

हा व्हिडीओ ‘टायगर 3’ चित्रपटाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यावर कोणतीही पुष्टी झालेली नाही.  ‘टायगर 3’ हा YRF स्पाय अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, इमरान हाश्मी आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आधीच उंचावली आहे. त्याच वेळी, 2023 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर तो हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.(bollywood actor salman khan is seen smoking in a viral video from tiger 3 clip goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्पिता शर्माच्या ईद पार्टीत धोनीची पत्नी अन् लेक झिवाची राॅयल एन्ट्री, साक्षीच्या लूकने चाहत्यांना पाडली भूरळ

शीझान खानने तुनिषा शर्माला म्हटले ‘चांद’! अभिनेत्रीसाेबतचा ‘ताे’ फाेटाे केला शेअर

हे देखील वाचा