मराठी मनोरंजनविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या लवकरच किंबहुना उद्या (५ मे) प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाचे नवोदित लेखक – दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे आज ४ मे गुरुवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी या सिनेमाचे निर्मान असलेल्या प्रकाश बाविस्कर यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून ते खूप आजारी होते.
स्वप्नील मयेकर यांनी वयाच्या केवळ ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वप्नील यांचा पहिलाच दिग्दर्शित आणि लिखित असलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित होणार असून त्या आधीच स्वप्नील यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

दरम्यान स्वप्नील मयेकर यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. स्वप्नील यांनी एका भोजपुरी चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते. त्यांनीच लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात खानदेशातील शेतकरी कुटुंबामधील युवक मुंबईत व्यावसायिक बनण्यासाठी येतो. त्याची संघर्षकथा या मांडण्याचा प्रयत्न स्वप्नील यांनी केला आहे. या सिनेमात अभिनेता चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…










