नुकताच मणिरत्नम यांचा बहुप्रतिक्षित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ऐश्वर्या राय आणि विक्रम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. यातच आता विक्रम बाबतीत एक वाईट बातमी समोर येत आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विक्रमचा सेटवर अपघात झाला असून यात तो चांगलाच जखमी झाला आहे.
प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार विक्रमला या अपघातात भयंकर मार लागला असून, यात त्याच्या छातीची बरगडी तुटली आहे. या अपघातानंतर त्याला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्यावर काही उपचार करून डॉक्टरनी त्यांना घरी सोडले आहे. सध्या विक्रम आराम करत आहे. या अपघाताची माहिती विक्रमच्या मॅनेजरने ट्विटरवर ट्वीट करत दिली आहे.
अभिनेता विक्रम सध्या त्याचा आगामी ‘थंगालन’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच शूटिंग दरम्यान त्याच्यासोबत हा अपघात झाला आणि त्याची बरगडी तुटली. विक्रमच्या मॅनेजरने ट्विट करताना सांगितले की, चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेन्सवर काम करताना विक्रमला ही दुखापत झाली. सध्या सिनेमाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. विक्रमचे मॅनेजर सूर्यनारायण यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले, ‘विक्रमला शूटिंग करताना दुखापत झाली असून, त्याची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. आता तो काही काळ ‘थंगालन’चे शूटिंग करू शकणार नाही. सध्या तो बरा असला तरी त्याला डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.’
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…










