बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार जोड्या आहेत, त्यांनी एकत्र काम केलेले चित्रपट सुपरहिट झाले आहेत. प्रेक्षकांना देखील त्यांची चित्रपटातील जोडी अत्यंत आवडली आहे. या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद देखील केली आहे. परंतु बॉलिवूडमध्ये असे देखील कलाकार आहेत, ज्यांनी एकत्र काम करावं असा प्रेक्षकांचा कायमची इच्छा राहिली आहे. परंतू आजतागायत त्यांनी एकत्र काम केलेले नाही. तर जाणून घेणार आहोत अशाच काही बॉलीवूड कलाकारांबद्दल ज्यांनी आजपर्यंत एकत्र काम केले नाही.
शाहरुख खान-आमिर खान
बॉलीवूडमधील किंग खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट यांनी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही. हा परंतु सलमान खानने या दोन्ही अभिनेत्यांसोबत काम केले आहे. शाहरुख खान आणि आमिर खान या दोघांना अनेक वेळा स्पॉट केले गेले आहे.त्या वेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. त्यांच्यातील मैत्री पाहून प्रेक्षकांनी त्यांना एकत्र बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे दोनही सुपरस्टार समकालीन असून त्यांनी पन्नाशी पार केली आहे. या दोघांमध्ये एकेवेळी मोठी स्पर्धा असल्याचे बोलले जात होते. परंतू दोघेही आपल्या जागी महान आहेत. अनेक वेळा ते एकत्र येतील असे बोलले जात होते, परंतू तसे आजपर्यंत तरी झाले नाही.
कंगणा रणौत-रणबीर कपूर
कंगना रणौत बॉलीवूडमध्ये नेहमीच महिलाकेंद्रित चित्रपटात काम करताना दिसते. तिने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत रोमान्स केला आहे तसेच अनेक दिग्गजांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. परंतु रणबीर कपूर आणि कंगना रणौत या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आजपर्यंत तरी पाहायला मिळालेली नाही.
दीपिका पदुकोण- सलमान खान
दीपिका पदुकोणने आपल्या करिअरची सुरुवात शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात केली आहे. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये खूप नाव कमावले आणि अनेक वेगवेगळे अभिनेत्यांसोबत काम देखील केले आहे. परंतु बॉलिवूडमधील दबंग हिरो सलमान खान आणि दीपिका पदुकोण या दोघांनी आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही. सलमान खानची उंची ५.८ फुट व दिपिकाची उंची ५.९ असल्याकारणाने ते एकत्र येत नसल्याचे बोलले जाते.
अक्षय कुमार-राणी मुखर्जी
बॉलीवूडमधील खिलाडी अक्षय कुमारने आजपर्यंत अनेक आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. जवळपास त्याने ९०च्या दशकापासून अनेक अभिनेत्रींबरोबर सिनेमे केले आहे. परंतू असे असले तरी त्याने राणी मुखर्जी सोबत एकाही चित्रपटात काम केले नाही. तसेच राणी मुखर्जीने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तिने सलमान खान, शाहरुख खान तसेच गोविंदा यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु आजपर्यंत तिला अक्षय कुमार सोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. दोघांचीची ऑफ स्क्रीन मैत्री सगळ्यांना खूप आवडते त्यामुळे त्या दोघांना एकत्र बघायलाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.










