मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय राहते. ‘चोरीचा मामला’ फेम अमृता सध्या तिच्या विलक्षण फॅशन सेन्समुळे लाईमलाईटमध्ये आहे.
वेस्टर्न शॉर्ट ड्रेसपासून ते साडीपर्यंत ती तिच्या सौंदर्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अलीकडेच तिने लाल साडीतील काही फोटो पोस्ट केले होते. पारंपारिक लूकमधील तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. चाहत्यांसोबतच सेलेब्सही तिच्या फोटोवर कमेंट्स करत आहेत. याशिवाय अमृता तिच्या लेटेस्ट फोटोंमध्येही जबरदस्त आकर्षक दिसत आहे. फिकट निळ्या ड्रेसमध्ये जणू ती उन्हाळ्यात शीतलतेची भावना देत आहे.
अमृताच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फॅशन आणि डिझायनर साड्यांव्यतिरिक्त जिम आणि व्यायामाचेही बरेच फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील. यावरून सहज लक्षात येते की, ती तिच्या फिटनेसबद्दलही खूप गंभीर आहे.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सचिन कुंडलकरच्या ‘पॉनडिचेरी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटांतून तिने, बॉलिवूडमध्येही खास ओळख निर्माण केली आहे. विविध प्रकारच्या दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता स्वत: ला भाग्यवान मानते. तिला मराठी आणि हिंदी दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडते.